‘कळ लावे’ म्हणत नितेश राणेंची उद्धव ठाकरे व संजय राऊतांवर बोचरी टीका

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 06T173912.661

Nitesh Rane On Uddhav Thackeray :  भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व टउद्धव ठाकरें यांच्या बरोबरचे संबंध जगजाहीर आहेत. नारायण राणे यांचे दोन्ही मुलं नितेश राणे व निलेश राणे ही दोघं देखील उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर जोरदार तोंडसूख घेत असतात. अगदी याच पद्धतीने संजय राऊत व उद्धव ठाकरे देखील राणे पिता-पुत्रांवर टीका करत असतात.

गेल्या काही दिवसांपासून बारसूच्या रिफायनरी मुद्द्यावरुन संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध राणे कुटूंब असा वाद पहायला मिळतो आहे. उद्धव ठाकरे यांनी आज बारसू येथे भेट दिली. यावेळी त्यांनी रिफायनरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांशी भेट घेतली आहे. लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील. मात्र, रिफायनरी झाली पाहिजे, अशी शिंदे सरकारची भूमिका असल्याची टीका ठाकरेंनी केली आहे.

सीमाभागातील जनतेला सोडून दोन मंत्री कोणत्या बिळात लपले? राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका

तसेच आज भाजप नेते नितेश राणे, निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी दोन्ही राणे बंधूंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. यानंतर नितेश राणेंनी ट्विट करत संजय राऊत व उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचले आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सर्वांना नारद जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!! कोकणात कळ लावण्यासाठी दोघे अवतरले आहेत. पण कोकणी माणूस या कळ लावणाऱ्यांना थारा देणार नाही.. हे नक्की, असे म्हटले आहे. राणे यांच्या या टीकेमुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

Tags

follow us