बच्चू कडूंचा सरकारला दुपारी 12 पर्यंतचा अल्टिमेटम; अन्यथा शेतकऱ्यांसाठी थेट…

Bachhu Kadu सध्या राज्यामध्ये प्रहार या संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांसाठी शेतकरी आणि शेतमजूर हक्कयात्रा आंदोलन सुरू केले आहे.

Bacchu Kadu Criticized Devendra Fadnavis

Bacchu Kadu Criticized Devendra Fadnavis

Bachhu Kadu give ultimatum to government for Farmer Otherwise Stop the train : सध्या राज्यामध्ये प्रहार या संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांसाठी शेतकरी आणि शेतमजूर हक्कयात्रा आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बच्चू कडूंनी नागपूर-वर्धा महामार्ग पूर्णपणे ठप्प केला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत आपण आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यातच त्यांनी आता सरकारला दुपारी बारा वाजेपर्यंतचा अल्टिमेटन देत रेल्वे रोकोचा इशारा दिला आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

आमची चर्चेची तयारी आहे. चर्चेची दारं आम्ही बंद केलेली नाही. ते सरकार बंद केलेले आहेत. त्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत आम्ही सरकारची वाट पाहू. अन्यथा रेल्वे रोखून दाखवू असा आक्रमक पवित्रा घेत बच्चू कडू यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये राजू शेट्टी महादेव जानकर यांचा देखील सहभाग आहे.

बीव्हीजी व आम्ही पुणेकर संस्थेकडून जवानांची दिवाळी गोड! फराळ अन् भेटवस्तू देत भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी

हे आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी थेट ट्रॅक्टरचं स्टेरिंग हाती घेत मोर्चा काढला आहे. यामध्ये कडू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मंगळवारची रात्र जामठा स्टेडियमजवळ महामार्गावर झोपून काढली आहे. त्यामुळे नागपूर वर्धा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला असून या ठिकाणहून जबलपूर आणि हैदराबाद या ठिकाणी जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यानंतर आता कडू यांनी मागण्या मान्य न झाल्यास थेट रेल्वे रोखण्याचा इशारा दिला आहे.

बच्चू कडू यांच्या मागण्या नेमक्या काय?

प्रहार या संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांसाठी शेतकरी आणि शेतमजूर हक्कयात्रा आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये त्यांनी सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत की, कोणत्याही अटी शर्ती शिवाय शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज तात्काळ माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, ऊसाला यंदा प्रति टन 4300 रुपये एफआरपी द्या, कांद्याला किमान प्रति किलो चाळीस रुपये भाव द्या, कांद्यावरची निर्यात बंदी, किमान निर्यात मूल्य, निर्यात कर, हे कायमचे बंद करा, गाईच्या दुधाला किमान 50 तर म्हशीच्या दुधाला 65 रुपये दर द्या. या मागण्यांसठा कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Exit mobile version