Bachhu Kadu on State Government for Farmers Issues : राज्यामध्ये कृषीमंत्र्यांच्या सभागृहात रमी खेळल्याच्या व्हिडीओनंतर माणिकराव कोकाटेंचं खातं काढून घेण्यात आलं आहे. त्यानंतर कृषी खात दत्तामामा भरणे यांच्याकडे देण्यात आलं आहे. या सगळ्या घटना क्रमावरून राज्यात अगोदरच शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव हे सगळे विषय प्रलंबित असताना बच्चू कडू यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
काय म्हणाले बच्चू कडू?
कृषी खातं काढल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना क्रीडा खाते देण्यात आलं आहे. मात्र त्यांनी आता रमी हा गेम खेळामध्ये आणू नये. या गेमला शासकीय मान्यता दिल्यास समस्या निर्माण होईल. त्यामुळे त्यांनी मेहेरबानी करून रमी खेळणे बंद कराव एवढी अपेक्षा आहे. कारण या गेममुळे लाखो शेतकरी आणि मजूर यांच्यावर आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी पुढाकार घेऊन हा गेम बंद केला पाहिजे.
अरुण जेटलींनी धमकावल्याचा राहुल गांधींचा दावा; रोहन जेटलींनी इतिहासाचा उल्लेख करत फटकारलं
तसेच माणिकराव कोकाटे म्हटल्याप्रमाणे दत्तामामा हे हाडामासाची शेतकरी आहेत. तसेच 90% आमदाराने खासदार हे देखील शेतकरीच आहे. मात्र त्यांची हाड आणि मास दोन्ही आमच्या कामाला येत नाही. आज कुठल्याही पिकाला भाव नाही. दिवसेंदिवस भाव पडत चालले आहेत. देवेंद्र फडणवीस देखील अर्थतज्ज्ञ, राजकारणातील चाणक्य आहेत. मात्र ते शेतकऱ्यांचे होऊ शकले नाही याचे दुःख आहे.
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आरक्षणाच्या विरोधात; काँग्रेस नेते शशी थरुर नक्की काय म्हणाले?
ते म्हणाले दुष्काळ पडला तर कर्जमाफी करू. मग आता कर्जमाफीसाठी दुष्काळ पडण्याची वाट पाहायची का? जेवढे दुष्काळाने शेतकरी मरत नाही. तेवढे कमी भाव भेटल्याने मरत आहेत. तसेच कृषी मंत्र्यांच्या हातात काहीही राहिलेले नाही. ते बाहुले झाले आहेत. त्यामुळे त्यांनी हिंमत असेल तर कर्जमाफी करून दाखवावी. मात्र ते राजकीय गुलाम आहेत. शेतकऱ्यांची मत देखील आपल्याला मिळतात. हे ते विसरून गेले आहेत. त्यांना फक्त पक्षाचा झेंडा महत्त्वाचा झालाय. तिकीट भेटलं म्हणजे आमदार होता येतं. ही गुलामीच आता शिल्लक राहिले. लोकशाही कुठे गेली? असा सवाल यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे.