मुंबई : बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जात असतानाच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andahre) गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) रिपोर्टकार्डच बाहेर काढले आहे. राज्याला कधी नव्हे असा कुचकामी आणि नापास गृहमंत्री मिळाला आहे अशी जिव्हारी लागणारी टीकाही अंधारेंनी केली आहे.त्या बदलापूर येथे माध्यमांशी बोलत होत्या.
“आंदोलनाला राजकीय म्हणता लाजा वाटू द्या”; बदलापुरातील आंदोलनावरून जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल
यावेळी अंधारेंनी काल (दि. 20) बदालापूरमधील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही केला. रामगिरी महाराजांना भेटायला शिंदेंकडे वेळ आहे पण पीडित मुलीच्या घरी जायला त्यांना वेळ नाही असा सवाल करत वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकारबद्दल बोलणाऱ्या वामन म्हात्रेला अटक झाली पाहिजे अशी मागणीही अंधारे यांनी केली.
बदलापूर : विरोधकांनी आंदोलनाला राजकीय वळण दिलं, लाडकी बहीण योजनेचे बॅनर कुठून आले?
महाजान मंत्री आहेत का?
अंधारे म्हणाल्या की, बदलापूरच्या घटनेनंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी सर्वात पहिले समोर येऊन व्यक्त होणे महत्त्वाचे होते. मात्र, जबाबदार व्यक्ती सोडून टिल्ले-पिल्ले लोक बोलतात असे म्हणत काल आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन नागरिकांशी चर्चा करणारे गिरीश महाजन कोण? ते या खात्याचे मंत्री आहेत का? असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला. या सर्व घडामोडींवर महाजनांचा बोलायचा काय संबंध असेही त्या म्हणाल्या.
मोठी अपडेट! बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
आम्हाला फडणवीसांकडून अपेक्षा आहेत मग का नेमक्यावेळी फडणवीस बॅकसीट घेतात आणि इतरांना पुढे करतात असे म्हणत काल बदलापुरातील परिस्थिती नीट हाताळलं असतं तर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं नसतं. काल माध्यमांनी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जचे आणि हिंसाचाराचे फुटेज लोकांचा रोष वाढू नये म्हणून कुठेही सार्वजनिक होऊ दिले नाही. मात्र, जर हे फुटेज बघितले तर, तुमचे पोलीस किती अमानुषपणे वागले हे धडधडीत दिसत असल्याचे अंधारे म्हणाल्या.