Tushar Bhosale : ‘बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांची माफी मागावी’

मुंबई : बागेश्वर बाबा (Bageshvar Baba)काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन चांगलेच चर्चेत आले आहेत. आता बागेश्वर बाबांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबद्दल (Sant Tukaram maharaj)वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यामुळं आता बाबांविषयी सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जातोय. आता यांचं वक्तव्यानंतर धीरेंद्र शास्त्रींविरोधात (Dhirendra Shastri)संतापाची लाट उसळलीय. भाजपा आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले (Tushar Bhosale)यांनी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी […]

Bageshavar

Bageshavar

मुंबई : बागेश्वर बाबा (Bageshvar Baba)काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन चांगलेच चर्चेत आले आहेत. आता बागेश्वर बाबांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबद्दल (Sant Tukaram maharaj)वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यामुळं आता बाबांविषयी सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जातोय. आता यांचं वक्तव्यानंतर धीरेंद्र शास्त्रींविरोधात (Dhirendra Shastri)संतापाची लाट उसळलीय. भाजपा आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले (Tushar Bhosale)यांनी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी तुकाराम महाराजांची माफी मागावी असा इशारा दिलाय.
YouTube video player
बागेश्वर बाबांनी सांगितलंय की, संत तुकाराम महाराजांबद्दल म्हणाले की, त्यांची बायको त्यांना रोज मारायची, त्यामुळं ते देव देव करायला लागले, असं विधान केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर जोरदार टीका होतेय.

संत तुकाराम महाराज यांनी अन्नप्राशन केल्याशिवाय त्यांच्या पत्नी जेवण करत नव्हत्या. त्यामुळं चुकीचा इतिहास पसरवू नका, तुम्हाला जर खरी माहिती घ्यायची असेल तर देहूमध्ये या आणि तुकाराम महाराजांची माहिती घ्या, अशा शब्दात देहू संस्थानकडून बागेश्वर बाबांना सुणावलंय.

बागेश्वर बाबा आपल्या दरबारात अनेक चमत्कार करत असल्याची माहिती असतात. सध्या त्यांनी त्यांच्या प्रवचनात केलेल्या वक्तव्यावरुन ते वादात सापडलेत. आता संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं अनेकांनी माफीची मागणी केली आहे.

Exit mobile version