Download App

Bageshwar Dham : ट्रोल झाल्यानंतर पाटलांची सारवासारव; म्हणाले, मी त्यांना..

Bageshwar Dham : काही दिवसांपासून राज्यात बागेश्वर धाम (Bageshwar Dham) आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्यावरून राजकारण तापले आहे. त्यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला काँग्रेस, मनसे या पक्षांनी विरोध केलेला असताना काल मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) आणि धीरेंद्र शास्त्री यांची विमानतळावर भेट झाली. यावेळी पाटीस यांनी बाबांना नमस्कारही केला. या प्रकारावरून सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल केले जाऊ लागले. त्यानंतर आता या सर्व प्रकरणावर पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पाटील म्हणाले, की ‘मी माझ्या व्यक्तिगत कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो. परत येत असताना विमानतळावर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महराज यांची योगायोगाने भेट झाली. नंतर मी त्यांना आपल्या परंपरेप्रमाणे अभिवादन केले त्यांना नमस्कार केला.’

हे सुद्धा वाचा : Bageshwar Dham : मुंबईत कार्यक्रमाला विरोध पण राष्ट्रवादीचे प्रवक्ते बाबांच्या भेटीला 

‘यावेळी आमच्यात एक मिनिटांचा संवादही झाला. त्यांनी मला बागेश्वर धामला या असे निमंत्रण त्यांनी मला दिले. मी ही त्यांना सोलापूर जिल्ह्याला भेट द्या, असे निमंत्रण दिले. ही अनौपचारिक भेट होती पण यामुळे सोशल मिडीयावर जे काही ट्रोल केले जात आहे. वक्तव्य केली जात आहेत. त्यामध्ये काही लोकांचा गैरसमज झालेला आहे.

धीरेंद्र शास्त्री यांनी संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य केले होते त्याचे मी कधीच समर्थन करत नाही. किंवा माझ्या पक्षाचा माझ्या नेत्याचा जो विचार आहे याला छेद जाईल अशा पद्धतीने माझे वर्तन किंवा कृती होण्याचा कोणताच संबंध नाही. माझ्या विचारधारा व पुरोगामित्वाशी मी ठाम आहे.

धीरेंद्र शास्त्रींचा आज मुंबईत दरबार; मनसे-काँग्रेसचा विरोध, अंनिसने केली तक्रार दाखल

त्याच्याबद्दल संदिग्धता बाळगण्याचे काहीच कारण नाही. त्यांचे विचार त्यांच्याजवळ माझे विचार माझ्याजवळ. माझ्या भूमिकेत बदल असण्याचा काहीच संबंध नाही. आपल्या परंपरेप्रमाणे अभिवादन केले म्हणून आपली विचारधारा सोडून दिली असा अर्थ घेण्याचे काहीच कारण नाही,’ असे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, उमेश पाटील आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या भेटीच्या फोटोवरून  सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया दिल्या गेल्या. “ईकड पक्षाने आवाज उठवायचा…तिकड….” अशा स्वरूपाच्या अनेक कमेंट सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. एकीकडे पक्षाकडून विरोध केला जात असताना पक्षाचे नेते दर्शनाला जात असल्याने राष्ट्रवादीची कोंडी झाली.

Tags

follow us