Download App

नामदेव शास्त्री सीआयडीमध्ये आहेत की एलसीबीमध्ये?, मुंडेंना पाठींबा देताच बजरंग सोनवणेंचा खोचक सवाल

धनंजय मुंडे दोषी नाहीत, हे सांगायला नामदेव शास्त्री गुन्हे अन्वेषण विभागात आहेत की स्थानिक गुन्हे शाखेत आहेत? - बजरंग सोनवणे

  • Written By: Last Updated:

Bajrang Sonawane : महंत नामदेव शास्त्री (Mahant Namdev Shastri) यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात उघडपणे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची बाजू घेतली आहे. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर आता शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणेंनी (Bajrang Sonawane) भाष्य केलं. खंडणी आणि देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे दोषी नाहीत, हे सांगायला नामदेव शास्त्री सीआयडीमध्ये (CID) आहेत की, एलसीबीमध्ये (LCB) आहेत? असा बोचरा सवाल सोनवणे यांनी केला आहे.

नात्याची गोष्ट सांगणारा ‘स ला ते स ला ना ते’ सिनेमा! प्रेम म्हणजे काय रं…? गाणं प्रेक्षकांच्या भेटीला 

बजरंग सोनवणेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर बोलताना सोनवणे म्हणाले की, तुम्ही महाराज आहात, तुमच्या भावना तुमच्याजवळ, पण कोण गुन्हेगार आहे आणि कोण नाही, हे ठरवण्याचा अधिकार न्यायदेवतेला आहे. धनंजय मुंडे दोषी आहेत की नाहीत हे सांगायला तुम्ही सीआयडीमध्ये आहात की, एलसीबीमध्ये आहात?, असा सवाल सोनवणे केला. पोलिस यंत्रणा चौकशीचे काम करून, न्याय यंत्रणा न्याय देण्याचे काम करेल, असंही सोनवणेंनी आवर्जून सांगितलं.

धंगेकरांइतका मोठा नेता… नको रे बाबा ; पक्षप्रवेशापूर्वीच विरोधाचं नारळ फुटलं 

पुढं ते म्हणाले की, धनंजय मुंडेंना गडाचा आधार का घ्यावा लागतोय, हे मला कळत नाही. तुमचा पक्ष, तुमचे नेते, तुमचे सरकार तुमच्याच विरोधात जातेय म्हणून गडाच्या आश्रयाला जावं लागलं का, अशी खोचक विचारणाही सोनवणेंनी केली.

भगवान बाबांच्या विचारांना तिलांजली
नामदेव शास्त्री महाराज यांनी आज धंनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे समर्थन करणे अत्यंत दुर्दैवी आहे. भगवान गडासारख्या पवित्र ठिकाणावरुण अश्या गुन्हेगारी व्रताचे समर्थन आणि पाठराखण होणे, ही समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे. मुंडे-कराड टोळीचे समर्थन करताय ही मनाला न पटणारी बाब आहे. शास्त्री महाराज आपल्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे, पण आपण धनंजय मुडे, वाल्मिक कराड टोळीची पाठराखण करणे हे भगवान बाबांच्या विचारांना तिलांजली देण्यासारखे आहे, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली.

follow us