धंगेकरांइतका मोठा नेता… नको रे बाबा ; पक्षप्रवेशापूर्वीच विरोधाचं नारळ फुटलं

धंगेकरांइतका मोठा नेता… नको रे बाबा ; पक्षप्रवेशापूर्वीच विरोधाचं नारळ फुटलं

Sanjay Shirsat Reaction On Ravindra Dhangekar : पुण्यातले काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी (Ravindra Dhangekar) नुकतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Group) यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदेंच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी धंगेकरांसह ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी देखील शिंदेंची भेट घेतली होती. धंगेकर आणि शिंदेंच्या भेटीनंतर पुण्यात काँग्रेसला धक्का बसणार अशा चर्चा रंगल्यात. यावर आता शिंदे गटाचे नेते सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची प्रतिक्रिया समोर आलीय.

गुंड थोडेच संप्रादाय चालवतात? मुंडेंना महंतांकडून क्लिनचीट…जरांगेंची सटकली

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर धंगेकर नाराज असून शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की, अरे बापरे? धंगेकर इतका मोठा नेता आमच्याकडे नको बाबा. धंगेकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. परंतु त्यांच्या पक्षप्रवेशापूर्वीच विरोधाचं नारळ फुटल्याचं समोर आलंय.

यावेळी माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, पालकमंत्री पदाचा तिढा आत्ता राहिलेला नाही. ज्या दोन जागेचा वाद आहे, तो कदाचित आज संपेल. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होईल, हे बोलणं चुकीचं आहे. मुंडेंवर बोलताना ते म्हणाले की, भगवान गडावर जाणे चांगले आहे. एखाद्या संताच्या सानिध्यात जाणे, त्यात राजकीय संबंध लावणे काही कारण नाही, कोणीही कुठेही जाणे, त्यावर आक्षेप घेणे गैर असल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलंय.

Sonali Kulkarni :नाद खुळा! काळ्या स्कर्ट-टॉपमध्ये सोनालीचा स्टायलिश अंदाज

अंजली दमानियांवर भाष्य करणे योग्य वाटतं नसल्याचं ते म्हणाले आहेत. तर संजय राऊतांवर बोलताना शिरसाट म्हणाले की, ज्यांनी मुंबईची वाट लावली त्यांनी भ्रष्ट्राचारावर बोललं पाहिजे का? अडीच वर्ष सत्ता भोगताना जे घोटाळे केलेत, त्याचे पुरावे समोर येत आहेत. खिचडी चोरांनी आमच्यावर बोलू नये, असं देखील त्यांनी म्हटलंय. सगळे सामंत आमच्या बरोबर आहे, उबाठाचं ऑपरेशन कधी करायचं, याचा विचार एकनाथ शिंदे करतायेत, असं शिरसाट यांनी म्हटलंय.

संतोष देशमुख हत्येप्रकरणी सर्व तपास पोलीस करतील. पोलिसांना याचा तपास करू द्या, खुनीला फाशी दिली पाहिजे. राजकीय पुढाऱ्यांनी वक्तव्य देणे कमी केले पाहिजे, असा टोला संजय शिरसाट यांनी सुरेश धस यांना लगावला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube