‘ वाल्मिक कराडची राखच बाहेर येईल!’ बाळा बांगर यांचे खळबळजनक विधान

Beed News : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड (walmik Karad) याच्यावर आता आणखी एका खळबळजनक हत्येचा आरोप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी कराडवर महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा थेट आरोप केला आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत बाळा बांगर यांनी (Bala Bangar) अनेक धक्कादायक […]

Politics (76)

Politics (76)

Beed News : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड (walmik Karad) याच्यावर आता आणखी एका खळबळजनक हत्येचा आरोप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी कराडवर महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा थेट आरोप केला आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत बाळा बांगर यांनी (Bala Bangar) अनेक धक्कादायक वक्तव्य करत वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हेगारी आरोपांचे सावट आणखी गडद केलं आहे.

यावेळी बोलताना बाळा बांगर म्हणाले की, वाल्मिक कराडसाठी बीड पोलीस गुंडांचं काम करत होते. त्याच्याशी मैत्री ठेवून मी फक्त तोटाच केला. तो माझ्यावर दबाव टाकत होता. बलात्कार आणि विनयभंगाचे खोटे आरोप लावायचा प्रयत्न करत होता. महादेव मुंडे यांची हत्या 20 ऑक्टोबरला झाली होती. त्यानंतर कलम 307 अंतर्गत बाळा बांगर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

नोकरीत प्रमोशन अन् लग्नाचे योग, ‘या’ राशींसाठी आठवड्याचा पहिलाच दिवस ठरणार खास

खंडणी आणि गुन्हेगारी साम्राज्य?

वाल्मिक कराड हा माणूस षड्यंत्रकार आहे. एकीकडे दबाव टाकायचा, आणि दुसरीकडे समाजात स्वतःला चांगला दाखवायचा. पण त्याचं खोटेपण आता उघड होत आहे, असं बांगर म्हणाले. बांगर आणि कराड हे एकेकाळी चांगले मित्र होते. मात्र, वाल्मिक कराडच्या गुन्हेगारी कारवायांमुळे मी त्याच्याशी संबंध तोडले, असं स्पष्ट करत बांगर यांनी त्याच्याविरोधात खुलेआम आरोप केले. बांगर पुढे म्हणाले, मी आज संघर्ष करतोय, पण माझ्या आई-वडिलांनी मला लाडात वाढवलं. कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे कोणाच्याच हाती नसतं. पण वाल्मिक कराडसारख्या माणसाचं काळीज सशासारखं आहे. तो एक दिवस झोपेतच जाणार हे नक्की.

भाजपात येताच खोतकरांशी पंगा, त्यांचे सगळेच घोटाळे बाहेर काढणार; गोरंट्याल यांचा इशारा

कराडची संपत्ती

बांगर यांनी वाल्मिक कराडच्या प्रचंड आर्थिक सामर्थ्यावरही संशय व्यक्त केला. त्याच्याकडे पंधरा ते सोळा हजार कोटींची प्रॉपर्टी आहे. दररोज पंधरा-वीस कोटी रुपये खंडणी घेत असे. तो यमदूत होता, लोकांच्या लेकरांचे जीव घ्यायचा. असंख्य लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचा. वाल्मिक कराडची दोन्ही मुलं महादेव मुंडे यांच्या हत्येमध्ये आहेत. त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. कराड केव्हाच बाहेर येणार नाही; आणि आला तरी त्याची राखच बाहेर येईल.

प्रॉपर्टी सील होण्याची शक्यता

बांगर यांच्या मते, दोन ते तीन दिवसांत कोर्ट प्रॉपर्टी सील करण्याचा निर्णय घेईल. मग सगळा प्रकार उघड होईल. कराड जेलमधून बाहेर येऊन अजूनही लोकांवर दबाव टाकतोय. हे सर्व तो पैशाच्या जोरावर करत आहे. एकूणच, बाळा बांगर यांच्या या जाहीर आरोपांमुळे बीड जिल्ह्यात तसेच मराठवाड्यात खळबळ माजली आहे. पोलीस प्रशासन आणि न्यायालय याकडे कसे पाहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात महादेव मुंडे हत्येचा तपास नव्याने वेग घेणार का? वाल्मिक कराडविरोधातील आरोपांत आणखी तथ्य सापडेल का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

 

Exit mobile version