Balasaheb Thackeray यांच्या ‘त्या’ ३३ वर्षांच्या लढ्याला आले यश!

मुंबई : सन १९८८ साली पहिल्यांदा शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी औरंगाबादचे (Aurangabad) नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) असे करावे अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेऊन मागणी केली होती. म्हणजे मागील ३३ वर्षांपासूनच्या लढ्याला आखेर यश आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली […]

Balasaheb Thackeray_LetsUpp

Balasaheb Thackeray_LetsUpp

मुंबई : सन १९८८ साली पहिल्यांदा शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी औरंगाबादचे (Aurangabad) नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) असे करावे अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेऊन मागणी केली होती. म्हणजे मागील ३३ वर्षांपासूनच्या लढ्याला आखेर यश आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे (Osmanabad) ‘धाराशिव’ (Dharashiv), असे नामांतर करण्यास मंजुरी दिली आहे. एमआयएम (MIM) पक्ष वगळता अन्य सर्वच पक्षांचा या नामांतराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे दोन्हीही जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम औरंगाबादचे नामांतर करण्याची मागणी केली होती. त्यासाठी औरंगाबाद येथे त्यांनी जाहीर सभा घेऊन औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांकरण करण्याची जाहिररित्या मागणी केली होती. औरंगाबादच्या जनतेने देखील याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. तेव्हापासून हा नामांतराचा लढा सुरु होता. आज आखेर ३३ वर्षांनी या चलवळीला यश येत आहे.

औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’करण्यास केंद्राची मंजुरी

राज्य सरकारच्या नामांतर निर्णयाला केंद्र सरकारने आखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षांच्या लढ्याला यश आले आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रातून येत आहे.

गेल्या काही वर्षात केंद्र आणि राज्यात परस्पर विरोधी सरकार असल्याने नामांतर प्रस्ताव केंद्राकडून मंजूर केला जात नव्हता. त्यामुळे औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्याच्या नामांतराचा प्रस्तावाची केवळ टोलवाटोलवी सुरु असल्याचे पाहायला मिळत होते.

Exit mobile version