PM Kisan Sanman Yojana : राज्यात आणि देशात बांग्लादेशी घुसखोरांचा मुद्दा चर्चेत आला आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांत बांग्लादेशी नागरिक सापडले आहेत. इतकेच नाही तर चक्क सरकारी योजनांत लाभार्थी बनून हे बांग्लादेशी योजनांचा फायदा घेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेत बांग्लादेशी महिलांनी लाभ घेतल्याचा मुद्दा काही दिवसांपूर्वी उपस्थित झाला होता. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी तर पीएम किसान सम्मान योजनेत बांग्लादेशी लाभार्थी असल्याचा खळबळजनक दावा केला होता.
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात या योजनेत 181 बांग्लादेशी लाभार्थी असल्याचा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणी आता मोठी कारवाई झाली आहे. या 181 बांग्लादेशी लाभार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. किरिट सोमय्या यांनीच ट्विट करत माहिती दिली आहे.
प्रधानमंत्री किसान योजने मध्ये “बांगलादेशी”
“प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” योजने मध्ये गाव भादवण तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथील 181 “बांगलादेशी” लाभार्थीचा विरोधात FIR गुन्हा क्रमांक 75 दिनांक 26/3/2025 दाखल.
भारतीय दंड संहिता कलम Section 417, 465, 468 आणि माहिती तंत्रज्ञान… pic.twitter.com/w0dJS9H9gX
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 27, 2025
पीएम किसान सन्मान योजनेत बांग्लादेशी लाभार्थी आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एका गावात या योजनेत 181 बांग्लादेशी लाभार्थी लाभ घेत आहेत असा दावा सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर सोमय्या यांनी या लाभार्थ्यांची यादीच जाहीर केली होती. एकाच गावात इतक्या मोठ्या संख्येने बांग्लादेशी लाभार्थी थेट सरकारी योजनेचा लाभ घेत असतील तर या प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी सोमय्यांनी केली होती.
वोट जिहाद प्रकरण, मुफ्ती इस्माईल सभागृहात भडकले, किरीट सोमय्यांवर हल्लाबोल
यानंतर किरिट सोमय्या यांनी 7 मार्च रोजी कळवण पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. 181 बांग्लादेशी नागरिकांनी नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील भादवण गावाचे रहिवासी असल्याचे दाखवून लाभ घेतल्याचा दावा त्यांनी केला होता. कळवण पोलिसांनी सोमय्या यांच्या या तक्रारीची दखल घेत या 181 बांग्लादेश लाभार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.