Baramati Bypoll : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उद्या 6 एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रोहित बनकर, डॉ. विजयकुमार पिसे आणि आकाश मोरे यांच्या नावाची चर्चा असून आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त असल्याची माहिती समोर येत आहे. या निवडणुकीसाठी आज संध्याकाळपर्यंत दिल्लीतून नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याविरोधात धनगर समाजाचा चेहार देण्याची तयारी करत आहेत. बारामतीमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात असल्याने या निवडणुकीसाठी आकाश मोरे यांना काँग्रेसकडून (Congress) संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तर मविआतीली घटक पक्षाने कोणतीही भूमिका घेतली तरी काँग्रेस भूमिकेवर ठाम राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांच्यासह आतापर्यंत 19 उमेदवारांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. अभिजीत बिचुकले यांनी या निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सर्व राजकीय पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर करावा असा आवाहन केलेल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
जिओचा IPO मोडणार सर्व विक्रम; होणार भारतातील सर्वात मोठी लिस्टिंग? जाणून घ्या सर्वकाही
बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत दाखल अर्ज
अभिजीत बिचुकले ( अपक्ष )
सागर भिसे ( अपक्ष )
सतिश कदम ( हिंदुस्तान जनता पार्टी )
राघू घटुकडे ( न्यू राष्ट्रीय समाज पार्टी )
त्रिशाला कांबळे ( अपक्ष )
गजानन गवळी ( अपक्ष )
दत्तात्रेय बेदरे ( अपक्ष )
रजाक मुलाणी ( अपक्ष )
दिलीप अळोणी ( अपक्ष )
विलास होळकर ( अपक्ष)
अरूण निटुरे ( राष्ट्रीय किसान बहूजन पार्टी )
अभिजीत कांबळे ( अपक्ष)
दादा थोरात ( अपक्ष)
संदीप खरात ( अपक्ष )
मिथून आटोळे ( अपक्ष)
अनिल तुपे ( अपक्ष )
संकेत गावडे ( अपक्ष)
