सुनेत्रा पवारांभोवती नव्या वादाचा भोवरा; पत्र परत घेतल्याच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापलं
ज्या नेत्यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीत पद देण्यात आलं नाही ही बाब कागदपत्रावरून स्पष्ट होतं.
The political atmosphere heated up :सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्ष निवडीच्या निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. खरं तर पक्षात अध्यक्षाच्या अधिकार घेण्याचा प्रयत्न केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष पदी निवड होताना कोणीही पक्ष ताब्यात घेऊ नये. आणि ज्या नेत्यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्या नेत्यांना पक्षाच्या कार्यकारिणीत कोणतंही पद देण्यात आलं नाही ही बाब कागदपत्रावरून स्पष्ट होतं. त्यामुळं पक्ष ताब्यात न आल्यानं अगोदरच नाराज असलेल्या नेत्यांनी आता सुनेत्रा पवार यांची निवड कशी चुकीची आहे. हे सांगायला सुरुवात केली आहे.
निवडणूक आयोगाला सोपवलेल्या कागदपत्रांमध्ये पहिल्या पानावर निवडणूक आयोगाला 28 जानेवारी म्हणजे अजित पवार यांच्या मृत्यूनंतर ते 10 मार्च सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड होईपर्यंत कुठलाही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये. असा मुद्दा मांडण्यात आला आहे. या मुद्द्यानुसार सुनेत्रा पवार यांची निवडच धोक्यात आली असल्याचा दावा केला जात आहे. कारण याच काळात राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकी संदर्भात देखील पत्र व्यवहार झाला आहे. त्यामुळं तो ही रद्द झाला आहे. असा अर्थ काढला जात आहे. मात्र,निवडणूक आयोगाला 28 जानेवारी ते 10 मार्च मधील पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असे पत्र देताना सुनेत्रा पवारांनी त्यात ‘ In this regard ‘ असा उल्लेख केला आहे.
याचा अर्थ पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय अधिवेशन संदर्भातील पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असा अर्थ होतो. पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय अधिवेशन संदर्भातील पत्रव्यवहार वगळता बाकी सर्व पत्रव्यवहार ग्राह्य होतो. त्याचबरोबर पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीसाठी झालेला पत्रव्यवहार राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यासोबत झालेला आहे , निवडणूक आयोगासोबत नाही. त्यामुळे त्यातही कोणती अडचण नसल्याचे पक्षाच्या वर्तुळातून सांगितले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा बदनाम होईल, प्रतिमा कशी मालिन होईल, नेत्यांमध्ये कसे मतभेद निर्माण होतील यासाठी अनेकांकडून प्रयत्न होत असल्याचं पाहायला मिळतंय.
आम्ही सगळे लोक पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंघपने काम करत आहोत. सर्व निर्णय एकत्र बसून घेतले जात आहेत. काही जण जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक आयोगाला दिलेले पात्र असेल किंवा राज्यसभेचे उमेदवारीचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांच्या एबी फॉर्मवर केलीली स्वाक्षरी असेल. हे सगळं पक्षाच्या घटनेला धरून झालेलं आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळं कोणतं पत्र परत घेण्याचा प्रश्नच नाही.
दुसरा मुद्दा म्हणजे प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्या सहीने पाठवलेले पत्र रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाही. तसंच पत्रात संवैधानिकदृष्ट्या चूका असत्या तर सदर पत्र हे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारलं असतं का? त्याचबरोबर पत्रात चुका असत्या तर तशा सूचना निवडणूक आयोगाने केल्या असत्या.