Bardoli Triple Murder Case: गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बारडोली येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करून त्यांना कालव्यात फेकल्याच्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणातील सहआरोपी सदानंद बदाने याला महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. बारडोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जळगावच्या एरंडोलमधील पाटील कुटुंबातील सहा जणांवर हल्ला करून त्यांना कालव्यात फेकण्यात आलं होतं. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला, तर 13 वर्षांचा मुलगा बचावला होता.
दुपारी पुण्यात, आता मुंबईत गोळीबार; माहीममधील सोन्याच्या दुकानावर अज्ञातांकडून फायरिंग
नेमकं काय घडलं होतं?
जळगावमधील नितीन पाटील यांचं कुटुंब रोजगाराच्या शोधात गुजरातला निघालं होतं. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाला ओळखीच्या व्यक्तींनी काम देण्याचं आमिष दाखवून गुजरातला बोलावल्याची माहिती समोर आली आहे. हे कुटुंब सुरतच्या दिशेने जात असताना बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली.
त्यानंतर कुटुंबातील सहाही जणांना मारहाण करण्यात आली आणि त्यांना वाहत्या कालव्यात फेकून देण्यात आलं. या घटनेत नितीन पाटील, त्यांची पत्नी कविता पाटील आणि कुटुंबातील अन्य तीन जणांचा मृत्यू झाला. मात्र, 13 वर्षाच्या मुलाने या घटनेतून कसाबसा जीव वाचवला. त्याच्या बचावल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी जरांगेंच्या घरी SIT दाखल; पेनड्राइव्ह ताब्यात घेणार!
हत्येमागे विमा घोटाळ्याचा संशय
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना विमा फसवणुकीचे धागेदोरे सापडले आहेत. मृत कविता पाटील आणि त्यांचे पती नितीन पाटील यांच्याविरोधात चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्यात विमा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
कविता पाटील यांचे पहिले पती संजय यांच्या मृत्यूला अपघाताचं स्वरूप देऊन विम्याची रक्कम मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. यासाठी बनावट कागदपत्रे आणि अपघाताचा अहवाल सादर करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात कविता आणि नितीन यांच्यासह अन्य काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
‘झुमका पटोला’च्या 10 लाख रील्सचा टप्पा पार! शर्वरी म्हणाली, गाण्यांच्या बाबतीत मी खूप भाग्यवान
या विमा प्रकरणाचा तपास सुरू असतानाच बारडोलीमध्ये पाटील कुटुंबावर हल्ला झाल्याने दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, याचा तपास आता केला जात आहे. विमा कंपनीशी संबंधित वाद, वैयक्तिक वैमनस्य आणि इतर संभाव्य कारणांचा विचार करून पोलीस तपास करत आहेत. मात्र, हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
जळगाव आणि गुजरात पोलिसांचा संयुक्त तपास
या घटनेनंतर गुजरात आणि जळगाव पोलिसांनी समन्वयाने तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील कारचालक दयानंद भदाणे उर्फ खंड्या याला जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पुढील चौकशीसाठी त्याला गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. आता सहआरोपी सदानंद बदाने यालाही महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे.
पुणे कोर्ट गोळीबाराच्या थरारात दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमधून ताब्यात
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी बारडोलीचे पोलीस निरीक्षक पी. एन. जाडेजा यांच्याशी फोनवरून संपर्क साधून संपूर्ण घटनेची आणि तपासाच्या प्रगतीची माहिती घेतली आहे.
