Bawankule gives clarification on Mundhwa land purchase case after Damania’s allegations : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी 40 एकर जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेत सरकारची फसवणुकीचा आरोप होत आहे. त्यानंतर काहींवर गुन्हे दाखल झाले आहेत. चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे, तर अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द झाला आहे. मात्र हा केवळ व्यवहार रद्द करण्यापूरतं नसून हा प्रचंड मोठा फ्रॉड आहे. असं म्हणत सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यावर आता मंत्री बावनकुळे यांनी ही व्यवहार रद्द करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं अश्वासन दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
अंजली दमानिया मला भेटल्या. त्यांच्यासोबत शिष्टमंडळ होतं. त्यांनी चर्चा केली. त्यात त्यांनी खरगे समिती समोर त्यांच मत मांडतील असं मान्य केलं. 24 दिवसांत रिपोर्ट येणार आहे. वाट बघू जे अधिकारी दिसतील त्यांच्यावर कारवाई करू. अजून काही दोषी असतील ते घरी जातील. आज पेपरवर जे काय वाटतं त्यांना दोषी ठरवलं. ही गव्हर्नमेंट लँड आहे. 42 कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार. 42 कोटी येणार ते कशाचे? 42 कोटीची नोटिस का दिली ते पाहावे लागेल? Igr सुट्टीवर आहे. सोमवारी बोलवणार आहोत. आमच्या अधिकाऱ्याने बंद साताबारा असताना का प्रक्रिया केली? याची चौकशी केली जाईल. तसेच जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये आमच्या मुद्रांक अधिकाऱ्याकडे लिहून देणार आणि घेणार या दोनहीमध्ये पार्थ पवारांची सही नाही.
PCMC मध्ये दादा अन् पवार करणार महायुतीचा ‘गेम’; खास मोहऱ्यानेच बातमी फोडली
या प्रकरणासाठी महसूल आणि पोलीस अशा दोन वेगवेगळ्या चौकशा आहेत. त्यामध्ये जो कोण दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई होणार. तसेच चौकशी समितीत महत्वाचे अधिकारी आहे. इनफ्ल्यूंस होणार नाही. हे चुकीचं केलंय एखाद्या वेळी स्टँम्प ड्युटी कमी करण्याचा कमी करण्याचा अधिकार आहे. पण सर्टिफिकेट पाहीजे. आयटी पार्कला सवलत नाही. पण हा चौकशीचा भाग आहे. यासाठी 21 दिवस आणखी लागतील. पोलिस तपास करत आहेत. असं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.
