नागपूर : धमक असेल तर काँग्रेसला सोडा मी अभिनंदन करेन, असं आव्हान भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचा दावा करत तुम्ही सावरकरांचा अपमान का सहन करतात? असा सवालही बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंनी केला आहे.
तसेच आमचं कुळ हिंदुत्ववादी आहे, तुम्ही तुमचं कुळ डुबवलं असल्याचं म्हणत बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. दरम्यान, मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी बावनकुळेंच्या कुळासह त्यांच्या अडनावाचा उल्लेख करीत सडकून टीका केली होती. ठाकरेंच्या टीकेनंतर बावनकुळेंनी त्यांच्यावर पलटवार केलाय.
NCERT बोर्डचा अभ्यासक्रम होणार नवीन शैक्षणिक धोरणानुसार; केंद्रीय शिक्षण खात्याची माहिती
बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे वारंवार माझ्या कुळाचा उल्लेख करीत आहेत. कधी बावनकुळे म्हणतात तर कधी एकशे बावनकुळे म्हणतात. माझ्या कुळाचा उल्लेख केल्याने उद्धव ठाकरेचं फर्स्ट्रेशन जात आहे तर चांगलं आहे. आमचं कुळ हिंदुत्ववादी आहे, तुम्ही तुमचं कुळ डुबवलं असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.
आगामी निवडणुकांच्या जागांवरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्र् सोडलं होतं. बावनकुळेंनी मिंधे गटाला तुमच्या अडनावाइतक्या तरी जागा द्याव्यात, असं म्हटलं होतं. त्यावरही बावनकुळेंनी ठाकरेंना चिमटा काढला आहे.
नाना पटोलेंनी ठाकरेंचा इशारा धुडकावला…. आम्ही सावरकरांच्या विचारांना मानणार नाही…
ठाकरेंनी कधी लोकसभा विधानसभा लढवली आहेत काय? जनतेतून ठाकरे कधी निवडून आलेत काय? मागच्या दरवाजातून उद्धव ठाकरेंनी प्रवेश केल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरेंनी कधीच निवडणूक लढवली नाही जनतेत मत मागायला आले नाहीत त्यांनी कशाला निवडणुकीच्या गोष्टी करायच्या, ज्यावेळी निवडणूक येईल तेव्हा उद्धव ठाकरेंना काय परिस्थिती होईल ते कळेलच, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, आता उद्धव ठाकरेंना भर सभेत सावरकरांचा अपमान सहन करणार नसल्याचं म्हटल्यानंतर तुम्ही काँग्रेसला सोडत ठाकरी बाणा दाखवा, असा सल्लाही चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजप, शिंदे गटासह चंद्रशेखर बावनकुळेंना चांगलंच धुतलं होतं. यावेळी त्यांनी बावनकुळेंनी आडनावाप्रमाणे मिंधे गटाला तेवढ्यातरी जागा द्याव्यात, असं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपला वाटतंय की ठाकरेंकडून शिवसेना तुम्ही घेणार पण तुमचे बावन्न काय एकशेबावन्नकुळं जरी खाली आले तरी शिवसेना ठाकरेंकडून कोणी घेऊ शकत नसल्याचा इशारा दिला होता.