Download App

भयंकर! बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची हत्या, छातीत वार करत क्रूरपणे संपवलं…

बीड शहराच्या माने कॉम्प्लेक्स परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. यश देवेंद्र ढाका या तरुणाची हत्या.

  • Written By: Last Updated:

Beed Crime News Journalist Son Killed : बीड शहराच्या माने कॉम्प्लेक्स परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. यश देवेंद्र ढाका या तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. गर्दी असलेल्या ठिकाणी हल्लेखोरांनी यशच्या पोटावर वार केला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.

पत्रकाराच्या मुलाची हत्या

यश हा बीडमधील (Beed) स्थानिक दैनिकाचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा असल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. या हत्येमागील कारण (Crime News) अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून गुन्हेगारी (Journalist Son Killed) पार्श्वभूमी, वैयक्तिक वाद किंवा इतर शक्य कारणांचा तपास सुरू होता. या घटनेनंतर बीड शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा (Yash Dhaka) प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हत्येने शहरात मोठी खळबळ

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पंचनामा सुरू आहे. यश हा स्थानिक वृत्तपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा असल्याने या हत्येने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. यश इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता.

छातीवर दोन प्राणघातक वार

तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. यशचा खून त्याचाच मित्र सूरज काटे याने केल्याचे स्पष्ट झाले आहे. महिनाभरापूर्वी वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान यश आणि सूरज यांच्यात वाद झाला होता. या रागातूनच सूरजने यशवर हल्ला केला. त्याने यशच्या छातीवर दोन प्राणघातक वार केले, जे थेट आरपार गेले. सध्या पोलिसांनी आरोपी सूरजविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे बीड शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे.

follow us