Download App

बीडमध्ये खळबळ! शिवसेना जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल; म्हणाले, पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना…

बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर अनेक प्रकारचा संघर्ष पाहायला मिळाला आहे. आता शिंदे गटाच्या प्रमुखाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Beed Lok Sabha Election : राज्यातील लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठा फटका बसलाय. त्यामध्ये मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर महायुतीला पराभव झालाय. यामध्ये बीडच्या भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त गाजली ती बीड लोकसभेची निवडणूक. (Beed Lok Sabha) आणखीही या निवडणुकांच्या अनुषंगाने काही ना काही घटना समोर येत असतात. (Pankaja Munde) आताही तसाच प्रकार समोर आलाय. येथे जातीय समिकरण असल्याने काहींनी विरोधात काम केल्याची चर्चा होती. आता शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने हे मान्य केल्याचं समोर आलं आहे.

सोनवणे यांच्यासाठी फिल्डिंग आता 70 वर्षांपुढील सर्वांचे आयुष्यमान योजनेंतर्गत मोफत उपचार; राष्ट्रपती मुर्मू यांनी केली घोषणा

बीड लोकसभा निवडणूक काळात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची चर्चा चालू असताना निवडणुकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांना त्यांनी कशी मदत करायची हे सांगतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओतून दोघांमधील संवाद ऐकायला मिळत आहे. तर, दुसरी ऑडिओ क्लिप ही मतमोजणीनंतरची आहे, ज्यामध्ये म्हाळस जवळा या कुंडलिक खांडेंच्या मूळ गावातून पंकजा मुंडेंना मुद्दामून लीड दिली. कारण, ओबीसी मताचा आपल्याला फायदा होऊ शकतो हे सांगत असताना बीड विधानसभा मतदारसंघातील सगळ्या बुथवर कशाप्रकारे बजरंग सोनवणे यांच्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावल्याचं ते सांगत आहेत.

कुंडलिक खांडेंचा फोन बंद Maratha Reservation : मराठा बांधवांनो मी येतोयं मनोज जरांगेंची पुढची रणनीती ठरली!

यामध्ये, धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड त्यांच्याबाबतीत बोलत त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचंही बोलत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर या संदर्भातील ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकाकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कुंडलिक खांडे यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, कुंडलिक खांडेंचा फोन बंद असून हा माझा आवाज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

नवं प्रकरण समोर आल्यानं संघर्ष

बीड लोकसभेमध्ये बजरंग सोनवणेंकडून पंकजा मुंडेंचा 6 हजार मतांनी पराभव झाला. मुंडेंचा तो पराभव मुंडे समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळालं. कारण, पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर जिल्ह्यात काही ठिकाणी आत्महत्याच्या घटना घडल्या. तर, पंकजा मुंडेंसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बंद पुकारण्यात आला होता. पाथर्डी, शिरुर, परळीसह विविध ठिकाणी बंद पुकारत पंकजा मुंडेंविरुद्धच्या पोस्टच्या अनुषंगाने निषेधही व्यक्त करण्यात आला आहे. त्यात हे नवं प्रकरण समोर आल्यानं या संघर्षाने पुन्हा पेट घेतला आहे.

follow us

वेब स्टोरीज