आता 70 वर्षांपुढील सर्वांचे आयुष्यमान योजनेंतर्गत मोफत उपचार; राष्ट्रपती मुर्मू यांनी केली घोषणा

आता 70 वर्षांपुढील सर्वांचे आयुष्यमान योजनेंतर्गत मोफत उपचार; राष्ट्रपती मुर्मू यांनी केली घोषणा

Free Treatment Under Ayushman Yojana: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 18 व्या लोकसभेला संबोधित केल. यावेळी त्यांनी वयस्कर लोकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. 70 वर्षांपुढील सर्व व्यक्तींवर आयुष्यमान योजने (Ayushman Yojana) अंतर्गत मोफत उपचार होणार आहेत. भाजपने लोकसभा निवडणुकीआधी (Free Treatment) घोषणापत्रामध्ये याचा उल्लेख केलेला आहे.

२० हजार कोटी रुपये ट्रान्सफर

राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितलं, नव्या सरकारमध्ये ७० वर्षांच्या पुढील वयाच्या सर्व व्यक्तींना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी सरकार चांगलं काम करत आहे. शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना जास्त आत्मनिर्भर केलं आहे असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

आयुष्यमान भारत योजना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार?, उद्धव ठाकरेंनी थेटच सांगितलं

भाजपच्या घोषणापत्रामध्ये ७० वर्षांपुढील सर्वांना मोफत उपचार दिले जातील असं सांगण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भात भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, प्रत्येक वृद्ध व्यक्तीला त्याच्या उपचाराबाबत चिंता असते. मध्यमवर्गासाठी ही चिंता जास्त गंभीर असते. त्यामुळे भाजपने आता नवा संकल्प केला आहे. प्रत्येक ७० वर्षांपुढील व्यक्तीला आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आणलं जाईल आणि त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील.

५ लाख रुपयांपर्यंत उपचार

आयुष्यमान भारत योजनेचा विस्तार करण्यात येईल आणि त्यात वृद्ध व्यक्तींना आणण्यात येईल. त्यांना मोफत आणि चांगली आरोग्य सुविधा पुरवली जाईल, असं भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं. या योजनेची सुरुवात दिवंगत भाजप नेते अरुण जेटली यांनी २०१९ मध्ये केली होती. याला ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ असं देखील म्हटलं जातं. या योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत केले जातात.

मुर्मू यांचं अभिभाषण नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन अमेरिकेतून भारतात परतले; हिंदू राष्ट्राबद्दल केलं मोठं विधान

दरम्यान, २४ जून रोजी १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु झालं आहे. आज राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांचं अभिभाषण झाले. यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या अनेक कामांचा उल्लेख केला. घटनेच्या कलम ८७ नुसार, प्रत्येक लोकसभा निवडणुकीनंतर अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतात. त्यानंतर लोकसभेतील सदस्य त्यावर चर्चा करतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या