गुलाल आपलाच! धनंजय मुंडे यांच्याकडून विजयी सरपंचांसह उमेदवारांचं अभिनंदन

बीड : परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत आतापर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीपैकी राष्ट्रवादीने सर्वाधिक 28 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पक्षाला फक्त 12 ठिकाणी विजय मिळवता आल्याचं पाहायला मिळतंय. परळी विधानसभा मतदारसंघातसर बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवल्यानंतर आमदार धनंजय […]

WhatsApp Image 2022 12 20 At 1.56.45 PM

WhatsApp Image 2022 12 20 At 1.56.45 PM

बीड : परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत आतापर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीपैकी राष्ट्रवादीने सर्वाधिक 28 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पक्षाला फक्त 12 ठिकाणी विजय मिळवता आल्याचं पाहायला मिळतंय.

परळी विधानसभा मतदारसंघातसर बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवल्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांनी ट्वीट करुन सर्व विजयी सरपंच व उमेदवारांचे अभिनंदन केलं आहे.

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, गुलाल आपलाच! परळी विधानसभा मतदारसंघ तसेच बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवले असून अनेक ठिकाणी आघाडीवर आहेत. सर्व विजयी सरपंच व उमेदवारांचे अभिनंदन.

Exit mobile version