Download App

रणजित कासलेंना आणखी एक दणका, एसपी नवनीत कावतांची महत्वाची माहिती

Ranjit Kasle :  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेत आला आहे.

  • Written By: Last Updated:

Ranjit Kasle :  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेत आला आहे. वल्मिक कराड (Walmik Karad) याच्या एन्काऊंटरची ऑफर  देण्याती आली होती असा धक्कादायक दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjit Kasle) यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वल्मिक कराड राज्याचे माजी मंत्री धनजंय मुंडे (Dhanjay Munde) यांचा निकटवर्तीय असुन संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात आहे. वल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी मला 50 कोटी रुपयांची ऑफर होती असा दावा रणजीत कासले यांनी केला आहे. तर आता या दाव्यावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत (Navneet Kanwat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक नवनीत कावत म्हणाले की, रणजीत कासले एक निलंबीत अधिकारी असून त्याची चौकशी सुरु आहे. रणजीत कासले यांनी काही अपशब्द वापरले असून ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आम्ही त्या प्रकरणात त्यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल केला असून त्याचा देखील तपास सुरु करण्यात आला असल्याची माहिती बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

रणजित कासले याने जातीय वक्तव्य करून भावना दुखावल्या प्रकरणी बीडमधील एका वकिलाच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोदीजी, संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार? हर्षवर्धन सपकाळांचा प्रश्न 

बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी बीड पोलीस सायबर विभागात पोलीस निरीक्षक म्हणून काम केलं आहे मात्र त्यांना काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी निलंबित केलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते?

रणजीत कासले अक्षय शिंदे प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा, एसआयटी बसवा, अशी बातमी मी टीव्हीवर बघितली. ही एसआयटी बसवून काहीही उपयोग होणार नाही. एसआयटीची बसवायची असेल तर केंद्राची एसआयटी बसवा, तरच यामधून सत्य समोर येईल. मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती.

‘आलेच मी’ असं म्हणत सईच्या लावणीची खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला

मी म्हणालो, हे पाप माझ्याकडून होणार नाही. 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी, अशी ऑफर दिली जाते. तो पोलीस अधिकारी कुठेही असेल तरी त्याला हव्या विभागाला बोलावून घेतले जाते.’, असं रणजीत कासले म्हणाले होते.

follow us