Download App

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ‘उबाठा’ ला जोरदार झटका, 25 ज्येष्ठ शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

BMC Election : शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करणारे परळ भोईवाडा परिसरातले जुनेजाणते शिवसैनिक

  • Written By: Last Updated:

BMC Election : शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करणारे परळ भोईवाडा परिसरातले जुनेजाणते शिवसैनिक विश्वनाथ (बुवा) खताते, विजय कलगुटकर आणि काशीताई कोळी यांच्यासह 25 ज्येष्ठ शिवसैनिकांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर भिवंडी तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण हाती घेतले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ शिवसैनिकांच्या प्रवेशाने पक्ष संघटन आणखी मजबूत झाले असून उबाठाला जोरदार झटका बसला आहे.

परळ भोईवाडाचे विश्वनाथ (बुवा) खताते यांची बाळासाहेबांचे जुनेजाणते सहकारी अशी ओळख आहे. दादर परळमध्ये शिवसेना रुजवण्यात विश्वनाथ (बुवा) खताते यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यासोबत विजय कलगुटकर आणि काशीताई कोळी यांनीही बाळासाहेबांसोबत काम केले होते. मागील अडीच वर्षात मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावले, यामुळे मुंबईतील मराठी कुटुंबांना हक्काची घरे मिळणार आहेत.

शिंदे यांच्या कामाने प्रभावित होऊन मूळ शिवसेनेत परतल्याबद्दल या ज्येष्ठ शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले. याचबरोबर आंबेडकर चळवळीचे नेते आणि राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवी गरूड यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

जबरदस्त ऑफर, Hyundai Venue वर चक्क 70 हजारांचा डिस्काउंट

भिवंडी तालुक्यातील कोनगाव ग्रामपंचायतीचे सदस्य महेंद्र भगत, प्रदोष म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. या पक्ष प्रवेशाने भिवंडी तालुक्यात शिवसेना मजबूत झाली आहे.

मोठी बातमी, 10 आणि 500 रुपयांच्या नवीन नोटा चलनात येणार, RBI ची घोषणा

follow us