Download App

भाजपने भाकरी फिरवली! अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले, संजय सावकारे यांची उचलबांगडी…

Bhandara Guardian Minister Changed   : राज्य सरकारने (BJP) आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री (Bhandara Guardian Minister) बदलण्यात आले असून, या पदावर आता पंकज भोयर (Pankaj Bhoyar) नियुक्त झाले आहेत. याआधी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे (Sanjay Savkare) होते.

पंकज भोयर हे सध्या वर्ध्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासकीय कामांमध्ये आपली ठळक छाप सोडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. यामुळे आता पंकज भोयर यांच्याकडे वर्ध्यासह भंडाऱ्याची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ब्रेकिंग! आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरावर ईडीचा छापा; 5,590 कोटींचा घोटाळा…

अचानक बदलीचे कारण

संजय सावकारे यांची भंडारा जिल्ह्यापासून येणारी लांबची प्रवासाची सोय आणि काही स्थानिक भाजप नेत्यांची नाराजी या कारणांमुळे पालकमंत्री बदलल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काही लोकांच्या मते, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या ध्वजवंदनापुरती जबाबदारी मर्यादित न राहावी, यासाठीही हा बदल केला गेला असावा. तसेच, तरुण नेत्यांना संधी देणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनावर योग्य पकड ठेवणे हेही बदलाचे महत्त्वाचे कारण असल्याचे जाणवते.

नवीन पालकमंत्री काय म्हणाले?

टीव्ही 9 मराठीशी बोलताना पंकज भोयर यांनी सांगितले, निश्चित वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी लक्षात घेऊन चांगल्या पद्धतीने काम करेन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ध्यात विविध शासकीय योजनांची अमलबजावणी पार पडली. तशाच प्रकारे शासनाच्या विविध योजना भंडारा जिल्ह्यातही पोहोचवणार आहे.”

गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका! मनोज जरांगेंवर आंबेडकरांचा संताप, सोशल मीडियावर पोस्टची चर्चा

पालकमंत्री बदलण्याचा निर्णय अचानक का?

पंकज भोयर म्हणाले, मला सुद्धा या निर्णयाची कल्पना नव्हती. भौगोलिक दृष्ट्या विचार करून हा बदल केला गेला असे वाटते. भंडारा संजय सावकारेसाठी लांब पडत होता, तर माझ्या स्थानापासून वर्धा आणि भंडारा दोन्ही जवळ आहेत. संजय सावकारे साहेबांनी सुद्धा उत्कृष्ट काम केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः विदर्भातून आलेले असल्याने प्रशासन आणि योजना अंमलबजावणीवर अधिक लक्ष ठेवले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

follow us