राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासून राजकीय (Nagar) पक्षांकडून जोरदार बैठका सुरू आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातून एक महत्त्वाची राजकीय घडामोडी समोर आली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची बैठक अहिल्यानगर शहरात पार पडली. मात्र, या बैठकीला भानुदास कोतकर यांची या बैठकीत उपस्थिती लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. आगामी निवडणुका पाहता भानुदास कोतकर यांची वाटचाल भाजपकडं तर नाही ना अशी देखील चर्चा शहरात जोरदार सुरू आहे.
भानुदास कोतकर हे राजकारणापासून सध्या दूर आहेत. परंतु, त्यांचा मुलगा संदिप कोतकर हे माजी महापौर आहे. तर, सून सुवर्णा कोतकर या माजी उपमहापौर आहेत.त्या काँग्रेस पक्षात होत्या. परंतु केडगावमधील एका खूनप्रकरणानंतर हे कुटुंब राजकारणापासून दूर गेले.
Ahilyanagar Election Observers : अहिल्यानगर जिल्ह्यात चार निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
आता पुन्हा राजकारणात येण्यासाठी ते चाचपणी करत असावेत. कारण येत्या काही दिवसांत अहिल्यानगर महानगरपालिकेचे निवडणूक आहे. केडगावमध्ये काही नगरसेवक निवडून आणण्याची भानुदास कोतकरांची ताकद आहे. कोतकरांना मानणारा मतदार आहेत. त्यामुळे पुन्हा ते राजकारणात येऊ शकतात.
अशातच त्यांनी आज मंत्रि विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या भाजपच्या बैठकीला हेजरी लावल्याने आता भानुदास कोतकर हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण त्यांच्यावर आरोप आणि त्यांना अटक झालेली असली तरी त्यांची एक ओळख आहे. त्याच ओळखीमुळे अनेक कार्यकर्ते आजही त्यांच्यासोबत असल्याने त्यांच राजकीय मुल्य पाहता भाजप त्यांना सोबत घेते की काय? अशीही चर्चा आहे.
