Bhaskar Jadhav : देवेंद्र फडणवीस अनाजीपंत, मोहित कंबोज हा देवेंद्र फडणवीस यांचा पाळीव कुत्रा

“मोहित कंबोज हरामखोर, तो १०० बापाची पैदास असेल तर त्याने हे आरोप सिध्द करुन दाखवावे” असं आव्हान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांना दिले आहे. काल मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकिट बुक केलं होतं, त्यांनी एकनाथ शिंदे यांना १०० वेळा फोन केला […]

Bhaskar Jadhav & Mohit Kamboj

Bhaskar Jadhav & Mohit Kamboj

“मोहित कंबोज हरामखोर, तो १०० बापाची पैदास असेल तर त्याने हे आरोप सिध्द करुन दाखवावे” असं आव्हान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांना दिले आहे. काल मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकिट बुक केलं होतं, त्यांनी एकनाथ शिंदे यांना १०० वेळा फोन केला होता असा गौप्यस्फोट केला होता. भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेवणं योग्य नसल्याने त्यांना गटात घेण्यात आलं नाही असंही ते म्हणाले. त्यावर भास्कर जाधव त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : Maharashtra Budget Session : कांदाप्रश्नी विरोधकांनी घेरलं; शिंदेंच्या मदतीला पुन्हा फडणवीस धावले

देवेंद्र फडणवीस यांचा अनाजीपंत असा उल्लेख

मोहित कंबोज यांना उत्तर देताना जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांचा अनाजीपंत असा उल्लेख केला. ते म्हणाले की, “मोहित कंबोज हा हरामखोर असून १०० बापाची अवलाद नसेल तर आरोप सिद्ध करेल.” कंबोज यांनी एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा असं म्हणज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही जाहीर आव्हान दिल.

ते म्हणाले, “तुमच्याकडे सत्ता भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, ईडी आहे. यासोबत सत्तेची मस्ती पण आहे. जर मी एकनाथ शिंदे यांना १०० काय पाच जरी फोन लावले असतील तर मोहित कंबोज यांनी ते सिद्ध करून दाखवावं.” ते पुढे म्हणाले की त्याला बोलावते, जे अनाजीपंत (देवेंद्र फडणवीस) आहेत, तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती संपवायला निघाला आहात. पण माझ्यासारखे १०० भास्कर जाधव उभा राहतील. त्यांना तुम्ही संपवू शकत नाही. असं आव्हान देखील त्यांनी दिलं.

मी आजवर कोणाच्या दारात गेलो नाही, तर एकनाथ शिंदेच्या दारात काय भास्कर जाधव जाणार असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

मोहित कंबोज यांचा दावा काय?

शिंदे गटात येण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शंभरवेळा फोन केले असल्याचा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यासोबत 22 जूनला बंडखोर आमदारामध्ये सामील करुन घेण्याचाही विनंत केली होती, असंही कंबोज यांनी म्हटलयं. कंबोज यांनी भास्कर जाधव यांची खरी कहाणी एका व्हिडिओद्वारे ट्विट करुन सांगितली आहे.

 

कंबोज ट्विटमध्ये म्हणाले, खिस्यानी बिल्ली खम्बा नोचें!ही म्हण आज भास्कर जाधव यांच्यावर लागू होते. 2022 ला शिवसेना फुटली तेव्हा मला शिंदे गटात घ्या, असं निवेदन भास्कर जाधव यांनी केलं होतं. मात्र सर्व आमदारांनी भास्कर जाधवांना सोबत घेण्यासाठी विरोध केला. भास्कर जाधवांवर विश्वास नाही ठेऊ शकत असं म्हणत त्यांना शिंदे गटात दाखल करुन घेतल नाही.

Exit mobile version