Bhaskar Jadhav On Shinde-Fadanvis : ठाकरे गटाचे खासदार भास्कर जाधव हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. कायम ते विरोधकांवर सडकून टीका करताना दिसून येतात. विधानसभा असू दे किंवा एखादी जाहीर सभा कायमच त्यांची भाषणे आक्रमक असतात. आता त्यांचे एक विधान चर्चेत आले आहे. त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
माझ्या 40-45 वर्षांच्या राजकिय आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कधी माझ्या अंगावर कधी माझ्या सहकाऱ्यांच्या अंगावर अनेक पैलवान आले. पण त्या सगळ्यांना मी लाल माती मात्र चारली. हा इतिहास बऱ्याच जणांना माहिती असेल. आजही मी अनेकांशी मी कुस्ती खेळतोय आणि कुस्ती करायची म्हटलं तर कुठल्याही प्रकारची कुस्ती मी खेळतो.
म्हणून माझ्या पैलवानांना मला सांगयचय की, प्रत्यक्षपणे मी मातीमध्ये जरी कुस्ती खेळलो नाही. तरी माझ्या क्षेत्रामध्ये मात्र मी आजही मी अनेकांशी मी कुस्ती खेळतोय. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा अशाच राहू द्या. प्रत्येक खुर्चीच्या कुस्तीमध्ये विजयी झालो. भविष्यात देखील अशा अनेक कुस्त्या खळून आम्ही विजयी होऊ. अशा प्रकारचा अशावाद व्यक्त करतो. अशी टोलेबाजी करत भास्कर जाधवांनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे.
आम्ही कबड्डी खेळणारी लोकं; भास्कर जाधवांची टोलेबाजी
यावेळी भास्कर जाधव हे रत्नागिरी येथे बोलत होते. रत्नागिरी येथे भव्य कुस्तीस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हे विधान केले आहे. भास्कर जाधव हे सध्या ठाकरे गटाचा किल्ला जोरदारपणे लढवताना दिसत आहे. जाधव यांनी अगोदर त्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील अनेकदा हल्लाबोल केलेला आहे. त्यांनी शिंदेंची नक्कल देखील केली आहे. त्यामुळे जाधव हे कायम चर्चेत असतात.