आम्ही कबड्डी खेळणारी लोकं; भास्कर जाधवांची टोलेबाजी

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 08T112451.458

 Bhaskar Jadhav :  ठाकरे गटाचे खासदार भास्कर जाधव हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. कायम ते विरोधकांवर सडकून टीका करताना दिसून येतात. विधानसभा असू दे किंवा एखादी जाहीर सभा कायमच त्यांची भाषणे आक्रमक असतात. आता त्यांचे एक विधान चर्चेत आले आहे. त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

आम्ही कबड्डी खेळणारे लोकं आहोत. त्यामुळे कबड्डीचे डावपेच आमच्या नसानसांमध्ये भिनलेले आहेत. त्यामुळे डावपेच वापरुन समोरच्याला गारद कसं करायचं हे आम्हाला चांगलचं माहिती आहे. आता जर कुस्ती कशी खेळावी हे तंत्र जर आम्हाला अवगत झालं तर कुस्तीची पकड कशी धरायची, विरोधकांची पाठ कशी जमिनीला टेकवायची हे तंत्र आम्ही लवकरच अवगत करु, अशी टिपण्णी त्यांनी केली आहे.

Sharad Pawar : एकत्रित काम करत असताना… ठाकरे गटाच्या अग्रलेखातील टीकेला पवारांचं उत्तर

यावेळी भास्कर जाधव हे रत्नागिरी येथे बोलत होते. रत्नागिरी येथे भव्य कुस्तीस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हे विधान केले आहे. भास्कर जाधव हे सध्या ठाकरे गटाचा किल्ला जोरदारपणे लढवताना दिसत आहे. जाधव यांनी अगोदर त्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील अनेकदा हल्लाबोल केलेला आहे. त्यांनी शिंदेंची नक्कल देखील केली आहे. त्यामुळे जाधव हे कायम चर्चेत असतात.

boat Accident : केरळमध्ये भयावह दुर्घटना, पर्यटकांची नाव उलटून 21 जणांचा मृत्यू

Tags

follow us