Sharad Pawar : एकत्रित काम करत असताना… ठाकरे गटाच्या अग्रलेखातील टीकेला पवारांचं उत्तर

Sharad Pawar : एकत्रित काम करत असताना…  ठाकरे गटाच्या अग्रलेखातील टीकेला पवारांचं उत्तर

Sharad Pawar On Samana Editorial : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या आजच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. पण ते वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका आजच्या सामनातून करण्यात आली आहे.

दरम्यान नुकतचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून आजच्या सामनातून पवारांवर टीका करण्यात आली आहे. अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

भाजपचा राष्ट्रवादी फोडण्याचाही प्लॅन होता, लोक बॅगा भरून तयार होते, सामनातून गौप्यस्फोट

त्यावर आता शरज पवारांची प्रतिक्रिया आली आहे. या टीकेला उत्तर देताना पवार म्हणाले, ‘मी काही तो अग्रलेख वाचलेला नाही. त्याचबरोबर सामना किंवा सामनाचे संपादक हे सर्व लोक आम्ही एकत्रित काम करतो. त्यामुळे एकत्रित काम करत असताना पूर्ण माहिती घेऊनच त्यावर भाष्य करणे योग्य राहील.’ अशी प्रतिक्रिया यावेळी शरद पवारांनी देत याविषयावर बोलणे टाळले आहे.

दरम्यान शरद पवार हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत त्यावेळी ते बोलत होते. या दौऱ्याबद्दल बोलताना पवार म्हणाले, ‘कामाची सुरुवात करणारच होतो आणि माझी एक पद्धत आहे. सोलापूर किंवा तुळजापुरातून मी माझ्या कामाची सुरुवात करतो.’ असंही यावेळी ते म्हणाले. तर नुकतच सोलापूरात पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा थेट सोलापूरचा दौरा केला

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube