भाजपचा राष्ट्रवादी फोडण्याचाही प्लॅन होता, लोक बॅगा भरून तयार होते, सामनातून गौप्यस्फोट

भाजपचा राष्ट्रवादी फोडण्याचाही प्लॅन होता, लोक बॅगा भरून तयार होते, सामनातून गौप्यस्फोट

Samana Editorial On Bjps Plan For broke Ncp : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या आजच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. पण ते वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका आजच्या सामनातून करण्यात आली आहे. त्याचबरोबर यामध्ये एक गौप्यस्फोटही करण्यात आला की, भाजपचा शिवसेना फोडली त्याप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचाही प्लॅन होता. राष्ट्रवादीचे लोक लोक बॅगा भरून तयार होते. असं यामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान नुकतचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून आजच्या सामनातून पवारांवर टीका करण्यात आली आहे. अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तर राष्ट्रवादीतील लोक पोडल्यानंतर त्या लोकांच्या लॉजिंग-बोर्डिंगची व्यवस्था देखील भाजपने केली होती. असा आरोप शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आला आहे.

Sharad Pawar मोठे नेते पण… वारसदार निर्माण करण्यात अपयशी, सामनातून परखड टीका

त्यामुळे आता या शरद पवारांवरील टीकेवर आणि राष्ट्रवादी फोडण्याच्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काय म्हटलं आहे सामनात नेमकं पाहुयात…

भाजपचा शिवसेना फोडली त्याप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचाही प्लॅन होता. राष्ट्रवादीचे लोक लोक बॅगा भरून तयार होते. राष्ट्रवादीतील लोक पोडल्यानंतर त्या लोकांच्या लॉजिंग-बोर्डिंगची व्यवस्था देखील भाजपने केली होती. मात्र पावरांच्या खेळीने भाजपचा प्लॅन केरात गेला. तर पवारांनी पक्ष भाजपच्या तंबूत न्यावा आणि आपल्या सहकाऱ्यांची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्समधून सुटका करावी असा एका गटाचा आग्रह होता. पवारांनी त्याला नकार दिला.

दरम्यान नवा अध्यक्ष नेमन्यासाठी करण्यात आलेल्या समितीतही तेच लोक होते जे भाजपात जाण्यात बॅगा भरून तयार होते. पण कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढे आणि भावनांपुढे पवारांचा राजीनामा नामंजूर करावा लागला. तिसऱ्या अंकाची घंटा वाजण्याआधीच पवारांनी नाटकाचा पडदा पाडला. असा गौप्यस्फोट आजच्या सामनातून करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube