भारत राष्ट्र समिती ही शेतकऱ्यांची पार्टी आहे, ते शेतकऱ्यांसाठी चांगले काम करत आहेत. म्हणून आम्ही या पक्षात प्रवेश केला आहे. आता यापुढे भारत राष्ट्र समिती आता देशभरात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणार आहे. अशी माहिती माजी हरिभाऊ राठोड यांनी आज पुण्यात दिली. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
हरिभाऊ राठोड यांनी काही दिवसापूर्वीच भारत राष्ट्र समितीचे नेते राव यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश केला होता. हरिभाऊ राठोड २००४ मध्ये भाजपकडून खासदार निवडून आले होते. २०१३ मध्ये त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. दोन वर्षांपूर्वी त्यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला. आता ‘आप’मधून ते ‘बीआरएस’मध्ये आले आहेत.
राज्यात लोकसभा आणि विधानसभा एकत्र होतील, असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे. तर मी लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणूका लढणार आहे, असं त्यांनी आजच जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुका आल्या की मी ओबीसी आहे, असं सांगतात. मत मिळवण्यासाठी ते अशा प्रकाराची वक्तव्य करतात. पण ते खोटे ओबीसी आहेत, अशी टीका त्यांनी केली.
आम्ही काही वर्षांपूर्वी केजरीवाल यांच्या पक्षात प्रवेश केला होता. पण केजरीवाल यांनी अचानक येऊन थेट उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला त्यामुळे आपचा राजीनामा दिला असल्याची माहिती दिली.
Ghungaru Teaser: सबसे कातील गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित
राज्यात मागील काही वर्षांपासून राज्यात एस.सी, एस.टी, दलितांच्या जागा ओपन मधून भरण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्या विरुद्ध उद्यापासून राज्यभरातील सर्व जिल्हातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत, याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माहिती दिली.