Download App

‘राष्ट्रवादी’ला मोठा धक्का! राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

NCP National Party Status Cancelled : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रसचा (NCP)राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच तृणमूल कॉंग्रेस (Trinamool Congress)आणि सीपीआय (CPI)या पक्षांचाही राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे.

…तर हीच खरी आमची संपत्ती; शिंदे गटाचे स्पष्टीकरण

निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा मोठा धक्का दिला आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष फक्त प्रादेशिक पक्ष म्हणून राहणार आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी पक्षाचे किमान चार राज्यांमध्ये अस्तित्व असणं गरजेचं असतं. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस या नियमांमध्ये अपात्र ठरल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी नेमके निकष काय आहेत?
लोकसभा निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये दोन टक्के जागांवर विजय मिळवणे आवश्यक असते.लोकसभेत किमान चार जागा आणि किमान सहा टक्के मते मिळाली पाहिजे. पक्षाला चार किंवा अधिक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.

किमान चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत सहा टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळणे गरजेचे आहे. यातील एक निकष पूर्ण करणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळतो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असला तर त्या पक्षाला देशभरात एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येते. त्याचबरोबर राजधानी दिल्लीत पक्षकार्यालयासाठी जागा मिळत असते.

Tags

follow us