Download App

शरद पवारांना मोठा धक्का, अमोल कोल्हे देणार खासदारकीचा राजीनामा

  • Written By: Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या बंडानंतर अनेक आमदार आणि खासदारांनी अजितदादांचा हात धरत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना धक्का दिला. यात शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील आघाडीवर होते. ते अजित पवार यांच्या शपथविधीला देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी काहीही न बोलण्याची भूमिका घेतली होती. मात्र, कालच्या बंडखोरीनंतर आता त्यांनी घुमजाव करत ‘मी साहेबांसोबत’ म्हणत शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले.

तसेच मतदारांनी जे मतदान केलं ते एका विचारधारेवर विश्वासावर ठेऊन केले असल्याने मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी माझा खासदार पदाचा राजीनामा शरद पवार साहेबांकडे देणार असल्याचे खासदार अमोल कोल्हेंनी लोकमतशी बोलताना सांगितले. (Big blow to Sharad Pawar, Amol Kolhe will resign from MP)

पुढे ते म्हणाले जर मी लोकांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका करून इतिहास सांगण्याचा प्रेयत्न करत असेल आणि मीच जर नैतिक मूल्याच्या विरोधात जात असेल तर ते योग्य नाही. म्हणून मी आज पवारसाहेबांसोबत आहे. परंतु हे अनैतिक राजकारण पाहता मी माझ्या खासदारकीचा राजीनामा शरद पवार यांच्याकडे सुपूर्त करणार आहे.

‘त्या’ किटी पार्टीला पवारांचं अध्यक्षपद मान्य मात्र पटेल-तटकरेंवरील कारवाई नाही; आव्हाडांचा हल्लाबोल

अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील अनेक समीकरण बदलली आहे. राष्ट्रवादीचे 53 पैकी 32 आमदार सध्या अजित पवार यांच्यासमवेत आहेत. तर 12 आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत. या आमदारांशिवाय 8 आमदार कुंपणावर आहेत. हे आमदार अद्यापही संभ्रमात असून नेमकी कोणाची साथ द्यायची या विचारात आहेत. याशिवाय काल सुनील तटकरे, अमोल कोल्हे आणि प्रफल्ल पटेल हे खासदारही अजित पवार यांंच्यासोबत होते.

यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणतात वेगळ्या कारणासाठी अजितदादांना भेटायला गेलो होतो, त्यावेळी आपणास कोणतीही कल्पना नव्हती की आज शपथविधी आहे. तेथे गेल्यानंतर शपथविधी असल्याची माहिती समजली. त्याचवेळी आपण कार्यालयाला राजीनामा तयार ठेवण्यास सांगितले होते. कारण मतदारांचा विश्वास तोडून यासाठी आपण राजकारणात आलेलो नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी जे मतदान केलं आहे ते एका विचारधारेवर, विश्वास ठेवून केलं आहे.

खासदार अमोल कोल्हे हे उद्या म्हणजे 4 जुलै रोजी आपल्या खासदारकीचा राजीनामा राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देणार आहेत. आता शरद पवार अमोल कोल्हेचा राजीनामा स्वीकारतात कि नाही हे पाहणं महत्वाचं असेल.

Tags

follow us