Download App

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, नांदेडसह ‘या’ शहराला होणार फायदा

Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज (30 जुलै) रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली

  • Written By: Last Updated:

Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज (30 जुलै) रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. राज्याच्या हितासाठी या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. माहितीनुसार, या बैठकीत राज्य सरकारने नांदेड (Nanded) येथील श्री गुरुजी रुग्णालयास शासकीय भाग भांडवल देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

याच बरोबर या बैठकीत आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीत कर्ज देण्याचा देखील निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवेसाठी अध्यादेश जारी करण्यात आला आहे तसेच 81 हजार कोटींच्या विशाल व अतिविशाल सात प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

81 हजार कोटींच्या विशाल व अतिविशाल प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याने राज्यात सुमारे 20 हजार जणांना रोजगार निर्माण होणार आहे तसेच या प्रकल्पांमुळे कोकण, मराठवाडा आणि विदर्भात गुंतवणुकीचा प्रमाण वाढणार असल्याची देखील माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

आज झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 10 मोठे निर्णय

1. या बैठकीत ठाणे महापालिकेच्या विविध उपक्रमांसाठी शासकीय जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2. आदिम जमातीतील कुटुंबांसाठी आवास योजना सुरु करणार

3. आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे.

4. महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवेसाठी अध्यादेश जारी करण्यात येणार.

5. विविध विभागांच्या वसतीगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात वाढ होणार.

6. श्री गुरुजी रुग्णालयास, नांदेड शासकीय भाग भांडवल देण्यात येणार.

7. महिलांच्या सक्षमीकरणासाठी जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मॅकॅनिझम उपक्रम सुरु होणार. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीमार्फत कर्ज मिळणार.

8. पूणांमाय सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य देण्यात येणार.

9. जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण व आधुनिकीकरण होणार.

संसदेत अनुराग ठाकूर यांनी काढली जात अन् राहुल गांधी भडकले, म्हणाले, माझ्यावर …

10 . यंत्रमाग सहकारी संस्थांना राज्य सरकारकडून अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचा निर्णय देखील आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

follow us