सलमान-दाऊद गँगची मदत करणाऱ्यांनो… बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गँगची फेसबुक पोस्ट

काल रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर ही हत्या कुणी आणि का केली याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच

सलमान तुझ्यामुळे आमच्या भावाला जीव गमवावा लागला; बाबा सिद्दिकींच्या हत्येवर बिश्नोई गँगची पोस्ट

सलमान तुझ्यामुळे आमच्या भावाला जीव गमवावा लागला; बाबा सिद्दिकींच्या हत्येवर बिश्नोई गँगची पोस्ट

Bishnoi Gang Responsibility Baba Siddiqui Murder : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची काल रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर ही हत्या कुणी आणि का केली याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच आता यामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. याबद्दल त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

काय म्हटलय पोस्टमध्ये 

काल रात्री माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान आता बिश्नोई गँगने फेसबुकवर पोस्ट करत या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. गँगच्या एका सदस्याने फेसबुक पोस्ट करत सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या ही फेसबुक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “सिद्दीकींचे बॉलिवूड अभिनेता सलमान खान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि अनुज थापन यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे ही हत्या केली आहे.”

बिश्नोई गँगच्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की,”सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होतं पण तुझ्यामुळे आमच्या भावाला जीव गमवावा लागला. आज बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचं कारण म्हणजे त्यांचे बॉलीवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहारातील दाऊद आणि अनुज थापन यांच्याशी असलेले संबंध आहेत असंही त्यामध्ये म्हटलं आहे.

 

Exit mobile version