Download App

भाजप राज्यात एकहाती सत्ता आणू शकत नाही, शिवसेना खासदारांच्या वक्तव्याने राजकीय चर्चा

  • Written By: Last Updated:

आजघडीला देशातील सत्तेची सर्व सूत्रे भाजपा कडे आहेत, पण राज्याच्या विचार केला तर सत्तेची सूत्र एकहाती भाजपच्या हातात कधीच मिळालेली नाहीत आणि मिळण्याची शक्यताही नाही, असं व्यक्तव्य शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

आगामी काळात राज्यात आणि देशात येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेनेकडून राज्यभरात प्रयत्न केले जात आहे. त्यानिमित्ताने शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर देखील जालना दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते जालन्यात बोलत होते.

भाजप प्रवेशावर काय म्हणाले अजितदादा? वाचा 10 मुद्द्यांमध्ये

यावेळी राज्यातील शिवसेना आणि भाजप यांच्या पक्षीय ताकदीवर बोलताना कीर्तिकर म्हणाले की देश पातळीवर भाजप ३५० खासदार निवडून आणू शकतं. मागच्या वेळी राज्यातील लोकसभेच्या ४८ जागापैकी २६-२२ असं वाटप झालं होतं. त्यात शिवसेनेचे १८ आले ४ पडले, भाजपचे २३ आले ३ पडले. राष्ट्रीय स्तरावर जरी भाजपनं ३५० खासदार निवडून आणले तरी महाराष्ट्रात त्यांची स्थिती वेगळी आहे. अशी माहिती कीर्तिकर यांनी दिली.

याच मुद्द्यावर पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप कमकुवत आहे, असं म्हणता येणार नाही. मात्र राज्यात ते शिवसेनेपेक्षा भाजप मजबूत आहे, हे आम्ही मान्य करणार नाही. याशिवाय आमच्याकडे निवडणुकांसाठी उमेदवार तयार आहेत, एका एका ठिकाणी चार चार उमेदवार रांगेत आहेत.

भाजप प्रवेशावर काय म्हणाले अजितदादा? वाचा 10 मुद्द्यांमध्ये

Tags

follow us