BJP Foundation Day : महाराष्ट्रात भाजप ३ कोटी सदस्य करणार; वर्धापन दिनी भाजपचा निर्धार

BJP Foundation Day: येत्या काळात महाराष्ट्रात भाजप तीन कोटी सदस्य करणार आहेत, त्यासाठी राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांनी काम करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.  यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यभरात सुरु केलेला सदस्य नोंदणी कार्यक्रमाची माहिती दिली. […]

Chandrasekhar Bawankule

Chandrasekhar Bawankule

BJP Foundation Day: येत्या काळात महाराष्ट्रात भाजप तीन कोटी सदस्य करणार आहेत, त्यासाठी राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांनी काम करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.  यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी राज्यभरात सुरु केलेला सदस्य नोंदणी कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की केंद्र सरकारच्या योजनांचा राज्यातील सहा कोटी लोकांना फायदा झाला आहे. त्या लोकांना आपल्याला जोडायचं आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने दिवसातील दोन तास काम करायचे आहेत.

हिंमत असेल तर निवडणुकीला उभे राहाच…शीतल म्हात्रेंचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज

याशिवाय राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारकडून देखील मोठ्या प्रमाणात योजना जाहीर केल्या आहेत. काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे देखील मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा झाला आहे. या लोकांशी देखील संवाद साधला पाहिजे, असंही ते म्हणाले.

एका एका मताने बदल घडवला

भाजपच्या जुन्या नेत्यांनी मोठं काम केलं आहे, ज्या काळात साधा गावात सरपंच होईल की नाही याची शक्यता नसताना जुन्या पिढीतील लोकांनी काम केलं. त्यांनी एक एक मत जोडलं त्याचा परिणाम म्हणजे आजची सत्ता आहे. असे मत यावेळी बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केलं.

RBI कडून रेपो दरात वाढ नाही; सामान्यांच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ होणार नाही

याशिवाय आज दिल्ली येथे पंतप्रधान मोदी यांनीही कार्यकर्त्यांना संंबोधन केले आहे. भारत हा हनुमानाप्रमाणे बलशाली बनत आहे. हनुमानाचे जीवन आपल्याला आयुष्यात पुढे नेण्यासाठी प्रेरणा देते. देश प्रथम हाच आमचा मुलमंत्र आहे. आज आपण देशाच्या कानाकोपऱ्यात हनुमान जन्मोत्सव साजरा करत आहोत. आजही हनुमानाचे जीवन हे भारताच्या विकासाच्या प्रवासात आपल्याला प्रेरणा देते, असे मोदी म्हणाले आहेत.

 

Exit mobile version