RBI कडून रेपो दरात वाढ नाही; सामान्यांच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ होणार नाही
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक संपली. बैठक संपल्यानंतर सकाळी १० वाजता गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. निर्णयाची माहिती देताना रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने सांगितले की रेपो दर एकमताने कायम ठेवण्यात आला आहे. म्हणजेच रेपो दर 6.50 टक्क्यांवर कायम आहे.
सलग सहा वेळा रेपो दरात वाढ केल्यानंतर आरबीआयने सातव्यां वेळी मात्र रेपो दरात वाढ न करून दिलासा दिला आहे. गेल्या वर्षीच्या मे पासून आतापर्यंत RBI ने 250 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. मात्र यावेळी दिलासा दिला आहे. त्यामुळे तुमचे कर्ज जास्त महाग होणार नाही आणि तुमचा EMI वाढणार नाही.
तेलंगणा पेपरफुटीप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिली कट रचल्याची कबुली
आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेताना तो 6.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, आम्ही अर्थव्यवस्थेत सुरू असलेली सुधारणा कायम ठेवत सहमतीने धोरणात्मक दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण गरजेनुसार पावले उचलली जातील, असेही ते म्हणाले.
सामान्य लोकांना दिलासा
रिझव्र्ह बँकेच्या या निर्णयामुळे महागड्या गृहकर्जाचा फटका बसलेल्या लोकांना दिलासा मिळाला आहे. रेपो दर न वाढवल्यानंतर आता बँका कर्जाच्या व्याजदरात वाढ करणार नाहीत. त्यामुळे कर्जाचा बोजा वाढणार नाही. ईएमआयमध्ये वाढ न झाल्याने तात्पुरता का होईना पण दिलासा मिळाला आहे.
विधानसभा निवडणूक कधी होणार, बावनकुळेंनी महिना सांगून टाकला..
रेपो रेटमध्ये वाढ झाल्यावर बँकांना आरबीआयला पूर्वीपेक्षा जास्त व्याज द्यावे लागते. रिझर्व्ह बँक जास्त व्याज आकारणार असेल तर बँका समोर तुमच्याकडून जास्त व्याज आकारणार हे उघड आहे. गेल्या सहा वेळेस रेपो दरात वाढ झाल्यामुळे कर्जे महाग झाली आहेत. गृह कर्ज, कार कर्जासह सर्व वैयक्तिक कर्जे महाग झाली आहेत. मात्र यावेळी आरबीआयने लोकांना दिलासा दिला आहे. रेपो दर जुन्या दरावरच कायम ठेवण्यात आला आहे.