Download App

भाजपाच्या संघटनात्मक निवडींमध्ये जिल्हाध्यक्षांची दुसरी यादी जाहीर; बीड, नगर, संभाजीनगरमध्ये कोण?

मराठवाड्यातील व राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अंतर्गत गटबाजी आणि सहमती होत नसल्याने शहर व जिल्हाध्यक्षांच्या निवडीला

BJP District President Appointment : भाजपाच्या संघटनात्मक निवडींमध्ये नव्या जुन्यांचा समन्वय साधत पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. (President) मंडळ अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शहर, जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया काही आठवड्यांपूर्वी पार पडली होती.

मराठवाड्यातील व राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अंतर्गत गटबाजी आणि सहमती होत नसल्याने शहर व जिल्हाध्यक्षांच्या निवडीला ब्रेक लागला होता. त्यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी आणि लातूर जिल्ह्याचा समावेश होता.

लातूरला कव्हेकर, बसवराज पाटील

याशिवाय मराठवाड्यातील परभणी ग्रामीणच्या अध्यक्षपदी सुरेश भुबंरे, लातूर शहर अध्यक्षपदी अजित पाटील कव्हेकर, लातूर ग्रामीण बसवराज पाटील, नांदेड उत्तर अॅड. किशोर देशमुख नांदेड, दक्षिण संतुकराव हंबर्डे तर बीड भाजपा शहर अध्यक्षपदावर शंकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

 

follow us