“काँग्रेसच्या हिंदूविरोधी वक्तव्यावर बोलू नका, निवडणुकीत हिंदुत्वापासून पक्षानेच रोखलं”, माजी प्रवक्त्याचा ठाकरेंवर हल्लाबोल

“काँग्रेसच्या हिंदूविरोधी वक्तव्यावर बोलू नका, निवडणुकीत हिंदुत्वापासून पक्षानेच रोखलं”, माजी प्रवक्त्याचा ठाकरेंवर हल्लाबोल

Nagpur News : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे. आतापर्यंत अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आणखीही काही जण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. अशी परिस्थिती असताना ठाकरे गटाकडूनही काही जणांची हकालपट्टी केली जात आहे. किशोर तिवारी यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर किशोर तिवारी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ठाकर गटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मी स्वखर्चाने किमान दहा वेळा मुंबईला गेलो पण त्यांच्याशी माझी कधीच भेट झाली नाही. आता या पक्षाला कोणताच कार्यक्रम नाही, दिशा नाही असे तिवारी म्हणाले.

तिवारी पुढे म्हणाले, मला प्रसारमाध्यमांवर हिंदुत्वाची भूमिका घेण्यापासून रोखण्यात आले. संजय राऊत यांनी नागपुरात येऊन स्वबळावर निवडणुका लढण्याची भूमिा मांडली आणि दुसऱ्याच दिवसापासून पक्षाला गळती लागली. राजन साळवी यांच्यासारखा नेता पक्ष सोडून गेल्यानंतरही कुणालाच जाग आलेली नाही. ज्याला जायचं त्याने जा आम्हाला काहीच फरक पडत नाही अशी भूमिका आत्मघाताची आहे.

संजय राऊत वगैरे सर्व लबाड लोक आहेत. त्यांच्यामुळे तर शिवसेनेची पत एकदमच अविश्वसनीय झाली आहे. काहीही बोलतात. तीन चार वर्षात मी जितके डिबेट केले त्यावेळी तर संजय राऊत यांच्या वक्तव्यावरच डिबेट व्हायचे. संजय राऊत जे रोज सकाळी बोलतात ते काय पक्षाचे विचार मांडत नाही तर स्वतःची भूमिका मांडत असतात. कारण पक्षाला आता काही कार्यक्रम नाही. ठोस भूमिका नाही.

पक्षाची विचारसरणी कट्टर हिंदुत्वाची होती. पण आता सनातन धर्मालाच शिव्या देत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सनातन धर्म आणि आरएसएसवर आक्षेपार्ह वक्तव्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर तर सातत्याने वार केले जातात. पण आमचे लोक यावर फार सौम्य आहेत. मला तर काँग्रेसच्या हिंदूविरोधी वक्तव्यावर बोलू नका. तुम्ही चॅनलवर जाऊ नका असे वारंवार सांगण्यात आले. अनिल देसाई बोलले हर्षल प्रधानांनी सांगितलं की तुम्ही आता जाऊ नका.

आघाडीत होणार बिघाडी? उद्धव ठाकरेंना काँग्रेस देणार मोठा झटका, राजकीय वर्तुळात चर्चा

आता शिवसेना उबाठा पक्षाला कोणताही कार्यक्रम नाही. दिशा नाही. पक्षाने जर एखादा कार्यक्रम हाती घेऊन वाटचाल केली असती तर इतक्या लोकांनी पक्ष सोडलाच नसता. सनातन धर्माच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून शिव्या दिल्या जातात. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून टीका होत असतानाही ठाकरे गटाने कधीच स्पष्ट भूमिका घेतली नाही अशी खंत तिवारी यांनी व्यक्त केली.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर खासदार पक्ष सोडून जात होते. तर या लोकांशी बोलण्यासाठी देखील कुणीच तयार नव्हते. मी मात्र त्यांच्याशी बोललो तेव्हा बऱ्याच जणांनी विनायक राऊत यांच्या दादागिरीला कंटाळून आम्ही पक्ष सोडत असल्याचे मला सांगितले होते. शरद पवार यांनी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला त्यावेळी सुद्धा ठाकरे गटाकडून विनाकारण नाराजी व्यक्त करण्यात आली असे किशोर तिवारी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube