Download App

बावनकुळेंकडे झेंडा अन् दुपट्टा तयार; राष्ट्रवादीच्या नेत्याची पाहतायत वाट

Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar :  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केले आहे. राष्ट्रवादीचा कोणताही नेता आमच्या संपर्कता नाही. मात्र जर कोणी आलं तर आमच्या पक्षाचा झेंडा व दुपट्टा तयार आहे, असे ते म्हणाले आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेक राजकीय हालचालींना वेग आला आहे. या सगळ्याचा पार्श्वभूमीवर बावनकुळेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार हे आपला गट घेऊन भाजपमध्ये येणार आहेत, असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यता आला होता. त्यावर आता त्यांनी उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही नेता आमच्या संपर्कात नाही. पण जर कोणी आमच्या पक्षात येत असेल तर आमचा झेंडा व दुपट्टा तयार आहे, असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता खरंच कोणी मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार

आम्ही कुणाच्या संपर्कामध्ये नाही आहोत. आम्ही कुणाला या असे देखील म्हणालो नाही. पण जर कोणी आमच्या पक्षात येत असेल तर आम्ही त्याला नाही म्हणणार नाही. आम्ही संन्यासी नाही आहोत, असे ते म्हणाले आहेत. आमचा राजकीय पक्ष आहे. पक्ष वाढवण्याचं आमचं रोजचेच काम आहे. त्यामुळे कोणी जरी आलं तरी आमचा झेंडा व दुपट्टा तयार आहे, असे ते म्हणाले आहेत.

अंबादास दानवे म्हणाले, शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादीत एकजूट…

दरम्यान, आज दुपारी बावनकुळेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सवाला तुम्ही साधं ट्विट करू शकला नाहीत. त्यामुळे तुम्हाला ‘जय बजरंग बली‘चा नारा दिल्यावर दुःख वाटणं साहजिकच आहे. कारण तुम्ही आता जनाब ठाकरेंच्या भूमिकेत आहात, असे म्हणत बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष केले आहे.

 

 

Tags

follow us