Sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार
गेले सहा दशके राजकीय जीवनात आहे, अनेक पदे मला मिळाली. सध्या मी राज्यसभेवर आहे. याची तीन वर्षे बाकी आहे. ही तीन वर्ष संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही आणि कोणतीही जबाबदारी घेणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी आज केली आहे. ते आज शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.
#WATCH मैं एनसीपी के राष्ट्रीय अध्यक्ष पद से इस्तीफा दे रहा हूं: एनसीपी प्रमुख शरद पवार pic.twitter.com/RiXHr3W0SC
— ANI_HindiNews (@AHindinews) May 2, 2023
यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद देखील सोडणार असल्याची घोषणा केली. पक्षातील पुढील निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची देखील त्यांनी घोषणा केली. त्यावेळी त्यांनी पक्षाची नवी समितीही स्थापन केली. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटिल, राजेश टोपे, जयदेव गायकवाड, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या समितीने नवा नेता निवड करावी, अशी माहिती त्यांनी दिली.
इतके वर्षे राजकीय जीवनात काम केलं आहे, मी आतापर्यंत ५६ वर्षे पदावर होतो. अजून तीन वर्षे माझी राज्यसभेची बाकी आहेत. कुठं थांबायचं हे मला माहिती आहे. त्यासाठी मी जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची लवकरच बैठक बोलवणार असल्याचंही ते म्हणाले.
राजकारणातून निवृत्ती पण…
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की माझी निवृत्ती सार्वजनिक जीवनातून नाही. या आधीही मी संशोधन, कृषी, शिक्षण क्षेत्रात काम करत होतो. यापुढे देखील मी त्या क्षेत्रात काम करत राहील अशी घोषणा त्यांनी केली.
LIVE NEWS & UPDATES
-
Live Blog | पवारांचा वारसदार ठरला ! सुप्रिया सुळे होणार नव्या अध्यक्षा ?; कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू
NCP Chief Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत आहेत. परंतु, अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेच यांचीच वर्णी लागेल, अशी माहिती समोर येत आहे.
सुप्रिया सुळे यांना पक्षाध्यक्ष होण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया १५ दिवसांपासून सुरू आहे. अजित पवार यांचं कथित नाराजी नाट्य सुरू असतानाच पक्षाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, अशी माहिती आता समोर येत आहे.
-
आम्ही विंनती करायला येतो, असं लोक म्हणतायेत
आम्ही विंनती करायला येतो, असं राज्यभरातील लोक फोनवर म्हणतायेत. अगदी रोजंदारीवर काम करणारे लोक देखील इकडे येतील. त्यामुळे तुम्ही आजच निर्णय घ्या.
अशी विंनती नरहरी झिरवाळ यांनी केली.
-
जितेंद्र आव्हाड ढसाढसा रडले
करुणानिधी यांनी शेवटपर्यंत काम केलं, अगदी खुर्चीवर बसून त्यांनी काम केलं. तुमच्या नावात देखील तीच ताकद आहे.
मी परवा तुमच्या गाडीत बसलो होतो, तेव्हा सांगितलं होत की आम्ही तुमचं दर्शन घेतलं कि पुढचे दहा दिवस निवांत जातात. पण या काळात तुम्ही असं केलं तर आम्ही काय करायचं.
-
तुम्हीच आमचे नेते, तुम्हीच आमची कमिटी
तुम्ही जे वय वगैरे सांगत आहेत, ते आम्हाला मान्य नाही. तुम्ही आजही आमच्या पेक्षा जास्त काम करत आहात.
त्यामुळे कमिटी वगैरे आम्हाला काही नको. तुम्हीच आमचे नेते, तुम्हीच आमची कमिटी
छगन भुजबळ यांचं वक्तव्य
-
जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर
यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एका सामान्य कुटुंबातल्या पोराला तुम्ही इतकं मोठं केलं. आम्ही तुमच्याकडे बघून राजकारण करतो. जर तुम्ही नसाल तर आमही काय करायचं.
-
साहेबांना तो हक्क नाही - जयंत पाटील
आम्ही आजवर शरद पवार यांच्या नावानेच मते मागतो. त्यांच्या नावाने लोक आम्हाला मतदान देतात. राष्ट्रवादी म्हणजॆ शरद पवार हीच ओळख आहे.
तुम्हाला पाहिजे तो निर्णय तुम्ही घ्या, तुम्ही भाकरी फिरवणार असं सांगितलं होत. तुम्ही आमच्या सर्वांचे राजीनामे घ्या. तुम्हाला वाटत त्या लोकांच्या ताब्यात पक्ष द्या
असं जयंत पाटील म्हणाले.
-
बोलण्यापूर्वी जयंत पाटील भावूक
जयंत पाटील यांना जेव्हा बोलण्यासाठी सांगितलं तर अश्रू अनावर झाले.
त्यांना मन दाटून आल्यामळे बोलता आले नाही
-
साहेबांनी कोणालाही विश्वासात घेतलं नाही
साहेबांनी कोणालाही विश्वासात घेतलं नाही, जसं तुम्हाला सांगितलं नाही. तसं आम्हांला देखील सांगितलं नाही, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.
ते म्हणाले की आमही त्यांना विंनती केली आहे की त्यांनी आपला निर्णय बदलावा.