वाढदिवस गिरीश महाजनांचा अन् चर्चा अजितदादांची; काय झाले, वाचा सविस्तर

BJP Leader Girish Mahajan and Ajit Pawar :  भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या अनेक समर्थकांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. पण एक बॅनर मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शक्यतो या बॅनरवर भाजपच्या नेत्यांचे फोटो असणे स्वाभाविक होते. पण या पोस्टरवर तर विरोधी पक्षातील नेत्यांचा फोटो असल्याने सर्वांच्याच भुवया […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 17T123017.817

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 17T123017.817

BJP Leader Girish Mahajan and Ajit Pawar :  भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या अनेक समर्थकांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. पण एक बॅनर मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शक्यतो या बॅनरवर भाजपच्या नेत्यांचे फोटो असणे स्वाभाविक होते. पण या पोस्टरवर तर विरोधी पक्षातील नेत्यांचा फोटो असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

गिरीश महाजन यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध असल्याचे मानले जाते. तसेच ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटवर्तीय मानले जातात. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लागलेल्या बॅनरची सर्व महाराष्ट्रात चर्चा होते आहे. या बॅनरवर चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा फोटो असल्याने सगळ्यांचेच लक्ष या फोटोकडे वेधले गेले आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे पोस्टर लागले असून यावर अजित पवार यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे तर देवेंद्र फडणवीस व इतर भाजप नेत्यांचा छोटा फोटो लावण्यात आला आहे. तसेच या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला आहे. तसेच अजित पवारांच्या फोटोखाली जिवा भावाचा माणूस असे लिहण्यात आले आहे.  एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी जो पहाटे शपथविधी घेतला होता, त्यानंतरचा फडणवीस-पवार- महाजन असा फोटो देखील या बॅनरवर लावण्यात आला आहे.

गिरीश महाजन यांची अजित पवार यांच्याशी देखील चांगली मैत्री असल्याचे मानले जाते. याचे कारण अनेकदा विधानभवनात किंवा इतर कार्यक्रमात हे दोघे एकमेकांवर मिश्किल टिप्पणी करत असल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे या पोस्टरवरुन काही वेगळा राजकीय संदेश दिला जातोय का, याबाबत बोलले जात आहे.

Exit mobile version