Download App

भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं वादग्रस्त विधान; इचलकरंजीची केली पाक व्याप्त काश्मिरशी तुलना

भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

  • Written By: Last Updated:

Harshvardhan Patil : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. पाटील यांनी इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे. धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला, “इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ हा तसा पाहिला तर पाकव्याप्त काश्मीर मानायला पाहिजे.” असं वादग्रस्त विधान (Harshvardhan Patil) हर्षवर्धन पाटलांनी  केले आहे.  त्यांच्या या वक्तव्यावर राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नवा वाद     IAS पूजा खेडकरसह अन्य पाच अधिकाऱ्यांचीही सोशलवर चर्चा; नेमकं कारण काय?

सांगलीच्या वाळवामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंती समारंभामध्ये हर्षवर्धन पाटील यांना बोलवण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.  लोकसभा मतदारसंघातून खरंतर धैर्यशील माने हे निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीचा अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटलांनी इचलकरंजीला थेट पाकव्याप्त काश्मीर म्हणून उपमा दिल्याने चांगलीच खळबळ उडाली असून, माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

भाजपात नाराज?  अदानी समुहाला मोठा दिलासा, हिंडेनबर्ग प्रकरणी पुनर्विचार याचिका SC ने फेटाळली

हर्षवर्धन पाटील सध्या भाजपात नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांना आता सोशल मिडियात व्हायरल होणाऱ्या एका पोस्टने खत पाणी दिलं आहे. मंगळवारी 18 जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून हर्षवर्धन पाटील हे बावडा येथील रत्नाई निवासस्थानी नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी उपलब्ध असल्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून ही पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. दरम्यान, या पोस्टमध्ये कमळ चिन्ह आणि भाजपचे नेते गायब आहेत. त्यामुळे ही चर्चा जोरदार रंगली आहे.

follow us

संबंधित बातम्या