Download App

किरीट सोमय्यांचं विखेंच्या विरोधात मंत्रालयातचं ठिय्या आंदोलन

Kirit Somaiyya :  भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आपल्या आंदोलनांसाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली आहेत. त्यांच्या या आंदोलनाची चर्चा अनेकवेळा मीडियात होत असते. बऱ्याचदा हटक्या पद्धतीने त्यांची आंदोलने होत असतात. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गटातील  अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले  आहेत. पण आता मात्र त्यांनी थेट आपल्याच सरकारविरोधात मंत्रालयात आंदोलन केले आहे.

किरीट सोमय्या हे भाजपचे नेते असून सध्या राज्यामध्ये भाजप सत्तेत आहे. तरी देखील त्यांना हे आंदोलन करावे लागत आहे. रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात  उद्धव ठाकरे यांचा बंगला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी कोर्लई येथे उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले असल्याचा आरोप केला आहे. यावरुन मंत्रालयातील महसूल खात्याच्या विरोधात सोमय्यांनी ठिय्या  आंदोलन  सुरु केले आहे.

Maharashtra Congress : नाना पटोले जाणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची नवी चर्चा

राज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री आहेत. त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर सोमय्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोमय्या हे कोर्लई गावातील उद्धव ठाकरेंच्या कथित बंगल्याच्या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. पण यावर कोणत्याही प्रकरणाची कारवाई होताना दिसत नाही आहे. यामुळे किरीट सोमय्या हे आज आपल्याच सरकार विरोधात आंदोलनाला बसले आहेत.

संजय राऊत वि. नारायण राणे संघर्ष पेटला, राऊतांकडून अब्रुनुकसानीचा दावा दाखल

दरम्यान, आज सकाळी किरीट सोमय्या यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्यांनी संजय राऊतांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्या विरोधात पुणे पोलिसांमध्ये कोविड भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा दाखल असल्याचे म्हटले आहे.

Tags

follow us