संजय राऊत पाकिस्तानचे एजंट; नितेश राणेंचा मोठा आरोप

Nitesh Rane On Sanjay Raut :  भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी सामन्याच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला राणेंनी जोरदार उत्तर दिले आहे. तसेच बारसू येथे लाठीचार्ज करण्याचे आदेश फडणवीसांनी दिल्याचा राऊतांनी आरोप केला होता. त्याला देखील […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 29T104953.492

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 29T104953.492

Nitesh Rane On Sanjay Raut :  भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी सामन्याच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला राणेंनी जोरदार उत्तर दिले आहे. तसेच बारसू येथे लाठीचार्ज करण्याचे आदेश फडणवीसांनी दिल्याचा राऊतांनी आरोप केला होता. त्याला देखील राणेंनी उत्तर दिले आहे.

संजय राऊत हे पाकिस्तानचे एजंट असल्याचा टीका नितेश राणे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यासाठी मॉरिशस येथे बोलवले हे राऊतांना झोंबले आहे. याचे कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना साधं कोणी भिवंडीत देखील कोणी बोलावत नव्हते, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

राऊत म्हणतात ही रिफायनरीची कंपनी इस्लामिक आहे. याआधी मुंबईमध्ये बसेस घेण्यासाठी पाकिस्तानच्या कंपनीकडून आणल्या होत्या. पाकिस्तानची कंपनीला हे टेंडर देण्यता आले होते. त्यावेळी तुम्ही आदित्य ठाकरे यांनी काही बोलले नाहीत. पण आता पाकिस्तानचे एजंट संजय राऊत झाले आहेत, असा टोला नितेश राणेंनी त्यांना लगावला आहे.

राष्ट्रवादीत खरंच भाकरी फिरली का?

संजय राऊत यांच्यातोंडातून मराठी माणूस हा शब्द शोभत नाही. पत्राचाळीतील लोक मराठी नव्हते का. यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे 100 दिवस यांना जेलमध्ये रहावे लागले होते. एका बाजूला मराठी माणसाला बेघर करायचे आणि दुसरीकडे मराठी माणसाची बाजू घ्यायची. यांनी कितीतरी मराठी माणसांना बेघर केले आहे. बेळगावला जायच्या आधी पत्राचाळीत जा, ते लोक नागडं करुन पाठवतील, असा घणाघात नितेश राणेंनी केला आहे.

Exit mobile version