खासदारांनंतर आमदार अहिरांचीही शिंदेंना साथ! ठाकरेंकडे विधान परिषदेत किती आमदार राहिले?

Sachin Ahir Thackeray अहिरांच्या जाण्यानंतर ठाकरेंकडे विधान परिषदेत किती आमदार राहिले? जाणून घ्या...

Sachin Ahir Thackeray

Sachin Ahirs nomination Deputy Chairman by Shiv Sena How many MLC remain with Thackeray : शिंदेंकडून ठाकरेंना सर्वात मोठा धक्का देण्यात आला आहे. कारण ठाकरेंच्या पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेकडून विधानपरिषद उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता खासदारांनंतर अहिर देखील शिवसेनेत जाणार आहेत. लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश होणार असून यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट आमदार मनीषा कायंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र अहिरांच्या जाण्यानंतर ठाकरेंकडे विधान परिषदेत किती आमदार राहिले? जाणून घ्या…

शिंदेंचा थेट ‘मातोश्री’ला धडक देण्याची प्लान; अहिरांना फोडत आता लक्ष्य वरळी किल्ला

ठाकरेंकडे विधान परिषदेत किती आमदार राहिले?

शिंदेंकडून ठाकरेंना सर्वात मोठा धक्का देण्यात आला आहे. खासदारांनंतर सचिन अहिर देखील शिवसेनेत जाणार आहेत. अहिरांच्या जाण्यानंतर ठाकरेंकडे विधान परिषदेत पाच आमदार राहिले आहेत. त्यामध्ये खालील नावांचा समावेश आहे.

1 अनिल परब
2 मिलिंद नार्वेकर
3 अंबादास दानवे
4 ज. मो. अभ्यंकर
5 सुनील शिंदे

दरम्यान काही दिवसांपूर्वी सहा खासदारांनी ठाकरे गटाला केलेल्या जय महाराष्ट्रानंतर लागलेली गळती आता थेट आदित्य ठाकरे यांच्या ‘होम-ग्राऊंड’पर्यंत पोहोचली आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांना आपल्या गोटात खेचून केवळ एक आमदार मिळवला नसून, आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील पराभवाचा ‘रणसंग्राम’ अधिकृतपणे पुकारला आहे.

वरळी हा मतदारसंघ गेल्या अनेक दशकांपासून ठाकरे कुटुंबाचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो. मात्र, आता याच किल्ल्याला खिंडार पडले आहे. सचिन अहिर यांचे वरळी, परळ, लालबाग, भायखळा आणि दक्षिण-मध्य मुंबईत मजबूत संघटनात्मक जाळे आहे. कामगार संघटना, स्थानिक कार्यकर्ते आणि ओबीसी समाजात त्यांचा प्रभाव मानला जातो. अहिर यांचा या भागातील दांडगा जनसंपर्क, स्थानिक शाखांवरील पकड आणि ‘बेस्ट कामगार सेने’चा आधार पाहता, शिंदे गटाने त्यांना हाताशी धरून आदित्य ठाकरेंना त्यांच्याच मतदारसंघात कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे. या प्रवेशामुळे वरळीत आता ‘आदित्य ठाकरे विरूद्ध सचिन अहिर’ अशी थेट लढत होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

follow us