Nitesh Rane : उद्धव ठाकरे हे मविआवरील ओझं, राणेंचा हल्लाबोल

Nitesh Rane On Sanjay Raut :  भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. एवढ्या लवकर डेसिबल कमी होईल, व तोंड पडलेले दिसेल असे वाटले नव्हते. एकाच दिवसात एम टीव्हीचा आस्था चॅनेल झाला आहे, असे म्हणत राणेंनी राऊतांना डिवचले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर म्हणून […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 28T113811.397

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 28T113811.397

Nitesh Rane On Sanjay Raut :  भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. एवढ्या लवकर डेसिबल कमी होईल, व तोंड पडलेले दिसेल असे वाटले नव्हते. एकाच दिवसात एम टीव्हीचा आस्था चॅनेल झाला आहे, असे म्हणत राणेंनी राऊतांना डिवचले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर म्हणून नितेश राणे यांना उत्तर द्यायला भाजपने जबाबदारी दिली आहे. कालपासून नितेश राणे हे राऊतांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देत आहेत.

राऊतांनी माझ्या एकाच पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आहे. संजय राऊत हे ना शरद पवारांचे आहेत ना उद्धव ठाकरेंचे. ते आता लावारिस आहेत का, असा प्रश्न राणे यांनी केला आहे. ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेचे वर्ष माहित नाही, तो आम्हाला काय शिवसेना शिकवतो, असे म्हणत त्यांनी राऊतांना सुनावले आहे.

बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती…; मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

तसेच निवडणुक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले आहे. तरीसुध्दा उद्धव ठाकरे गट शिवसेना या नावाचा वापर करत आहे. याबद्दल मी शिवसेनेच्या नेत्यांशी बोलणाल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच 1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची होणारी सभा ही शेवटची सभा असेल, असे म्हणत त्यांनी मविआवर निशाणा साधला आहे.

खरगेंचे मानसिक संतुलन ढळले, मर्यादा ओलांडल्या; बावनकुळेंचा घणाघात

याआधी संजय राऊतांनी बोलताना शिंदे गट हे भाजपवर ओझं झाल्याचे म्हटले होते. यावर उद्धव ठाकरे हेच मविआवर जड झाल्याचे राणेंनी म्हटले आहे. दरम्यान, याआधी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर टीका केली होती. त्याला राणेंनी आता उत्तर दिले आहे.

Exit mobile version