Nitesh Rane On Sanjay Raut Threat : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आज जीवे मारण्याची धमकी आली आहे. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना धमकी देतानाची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. या व्हायरल रेकॉर्डिंगमध्ये संबंधित व्यक्ती राऊतांना धमकी देताना दिसत आहे. यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. याप्रकरणामध्ये त्यांनी थेट आदित्य ठाकरेंचे नाव घेतले आहे.
Champions Trophy 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद जाणार
माझ्या माहितीनुसार आदित्य ठाकरेंची चौकशी झाली पाहिजे. उबाठा शिवसेनेमध्ये उभी फुट पडलेली आहे. उभा संघर्ष सुरु आहे. म्हणूनच आवाज कुणाचा या पॉडकास्टमध्ये संजय राऊतला वगळण्यात आलेलं आहे. संजय राऊत हे उबाठा शिवसेना राष्ट्रवादीमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मी ऐकले आहे. तो विषय आदित्य ठाकलेला आवडलेला नाही. त्यामुळे संजय राऊत व आदित्य ठाकरे यांच्यात उभी फूट पडली आहे. त्यांच्यामध्ये संघर्ष सुरु आहे. त्यामुळे संजय राऊत यांना आलेल्या धमकी प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध आहे की नाही याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
https://letsupp.com/politics/law-and-order-nana-patole-attack-on-devendra-fadnavis-eknath-shinde-55735.html
तसेच मला तिथूनच वास येत आहे. लंडनला बसून आदित्य ठाकरेने फोन तर केले नाही ना, असे राणे म्हणाले. त्यामुळे आमच्या गृहमंत्र्यांवर बोलण्यापेक्षा किंवा भारतीय जनता पक्षावर बोलण्यापेक्षा तुझ्या मालकाचा मुलगा तुझ्या मागे पडला नाही ना, याची चौकशी करावी असा टोला त्यांनी राऊतांना लगावला. काल छत्रपती संभाजीनगर येथे राऊतांची सभा होती. तेव्हा आदित्य ठाकरेंच्या लोकांनी फोन करुन सांगितले की, तुम्ही तिथे जाऊ नका. त्यामुळे ती धमकी आदित्य ठाकरेंच्या लोकांनी दिली नाही ना याची चौकशी झाली पाहिजे, असे राणे म्हणाले.