आधी आपला पक्ष सांभाळा, निघाले तिसरी आघाडी करायला; विखे थेट पवारांवर घसरले

Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar :  भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.  संजय राऊत हे बेदखल व्यक्तिमत्व आहे. आम्ही त्यांना फार महत्व देत नाही, असे म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे. तसेच कर्नाटकमध्ये बदल झाला म्हणून लगेच महाराष्ट्रात बदल होईल असे […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 15T164549.672

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 15T164549.672

Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar :  भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.  संजय राऊत हे बेदखल व्यक्तिमत्व आहे. आम्ही त्यांना फार महत्व देत नाही, असे म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे. तसेच कर्नाटकमध्ये बदल झाला म्हणून लगेच महाराष्ट्रात बदल होईल असे नाही. त्यांची वज्रमूठ आम्ही मागच्या आठवड्यात पाहिली आहे. त्या वज्रमूठेला तडे गेले आहेत. आता ते एकमेकांच्या विरोधात मूठ चालवायला निघाले आहेत, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देखील त्यांनी सुनावले आहे. शरद पवार यांच्या पक्षाने  कर्नाटकची निवडणुक लढवली. त्यांना फार मोठा आशावाद होता. पण त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे आणि हे तिसरी आघाडी करायला निघाले आहे व पर्याय द्यायला निघाले आहेत. अगोदर आपला पक्ष सांभाळा, राज्य चालवायला आम्ही समर्थ आहोत, असे शब्दात त्यांनी पवारांना टोला लगावला आहे.

पुणे जिल्ह्याचे विभाजन करा; आमदार लांडगेंची फडणवीसांकडे मागणी; जिल्ह्याला नावही सुचवलं

यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे झालेल्या दंगलीवर देखील भाष्य केले आहे. माझ्या माहितीनुसार एका प्रार्थना स्थळामध्ये आधीपासूनच दगडं व शस्त्र आणून ठेवली होती. अशा प्रकारच्या घटना या खपवून घेतल्या जाणार नाहीत. ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असे कृत्य घडत असतील त्या पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. जर पोलिसांना बाहेरुन येणाऱ्या शस्त्रांची माहिती नसेल तर ही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशार त्यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.

मनपा, झेडपी निवडणुका 2024 मध्ये? ‘या’ कारणांमुळे भाजपला धडकी

यावेळी त्यांना भाजप मुद्दाम अशा घटना घडवून आणते असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे, यावर देखील ते बोलले आहे. कर्नाटकमध्ये पाकिस्तान  जिंदाबादच्या घोषणा कोणी दिल्या. त्या काही सत्तापक्षाने दिल्या नाहीत. मला वाटतं विनाकारण महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्याचे काम करु नये. ठाकरे गटाकडे पक्ष उरलेला नाही. त्यांच्याकडे आमदार- खासदार नाहीत. पक्षाचे अस्तित्व संपलेल्या लोकांनी असे आरोप करु नयेत, अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटाला सुनावले आहे.

Exit mobile version