Download App

‘ठाकरे ब्रँड जिवंत.., पण बाजारात चालत नाही’ सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

Sudhir Mungantiwar On Uddhav Thackeray’s Interview : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी (Sudhir Mungantiwar) शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना जोरदार टोला लगावला. ठाकरे ब्रँड (Uddhav Thackeray) अजून जिवंत आहे, पण आता तो ब्रँड बाजारात चालत नाही, असे म्हणत त्यांनी सध्याच्या जनमताचा हवाला दिला. प्रत्येक ब्रँड अँबेसडर यशस्वी होत नाही. सध्या मतदारांना तो ब्रँड पसंत नाही. मतदारांनी आपला पाठिंबा कोणाला (Maharashtra Politics) आहे हे स्पष्ट दाखवून दिलं आहे, अशी टीका त्यांनी केली.

ठाकरे ब्रँड जिवंत?

जेव्हा पराभवाचे चटके बसतात, तेव्हा सगळ्या ठिकाणी आपल्याला शेंदूर लावलेले दिसतात. ठाकरे ब्रँड जिवंत आहे. पण तो ब्रँड आता बाजारात चालत नाही. अनेक ब्रँड अँबेसेडर आहेत. प्रत्येक ब्रँड चालतो, असं नाही. सध्या ठाकरे ब्रँड चालत नाही, मतदारांना पसंत पडत नाही. ते स्वतःला सामान्य समजत असतील, जी सामान्य जनता आहे ती आमच्यासोबत आहे, मतदानामधून त्यांनी सांगितलं की, त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे.

‘सत्तेची खाज आणि चोरीचा माल’; उद्धव ठाकरेंची बॅटिंग, एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

शिवसेना (ठाकरे) गटाकडून एकनाथ शिंदेंवर जादूटोणा केल्याचे सूचक आरोप करण्यात आले होते, त्यावर मुनगंटीवार म्हणाले, राजकारणाचा स्तर डायनासोर झाला आहे. जर खरंच
जादूटोणा करून सत्ता मिळत असेल, तर तोच वापरून देशातून गरिबी, जातीयवाद हटवता आला असता. जादूटोणा ही केवळ अंधश्रद्धा आहे.

TRF वर अमेरिकेची मोहर! पाकिस्तानचा पारा चढला, भारतावरच उलटे आरोप

ऑनलाइन गेमिंगवर चिंता

मुनगंटीवार यांनी ऑनलाईन गेमिंगविषयीही चिंता व्यक्त केली. हे एक व्यसन झालं आहे. नव्या पिढीला यातून धोकादायक व्यसन लागण्याचा धोका आहे. ऑनलाइन गेमिंग, बॅटिंग आणि जुगारासारख्या गोष्टींवर योग्य कायद्यांच्या चौकटीत कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

राज ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न?

राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या सूचनेवर मुनगंटीवार म्हणाले, ती त्यांची वैयक्तिक अभिव्यक्ती आहे. समितीचा निर्णय आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. कोणता पक्ष काय भाषा वापरतो, हे त्या पक्षाच्या संस्कारांवर अवलंबून असतं. एकूणच, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विधानांवर मुनगंटीवार यांनी संयत पण स्पष्ट भाषेत उत्तर देत महायुती सरकारची भूमिका मांडली आणि भाजपला सामान्य जनतेचा पाठिंबा असल्याचं अधोरेखित केलं.

 

follow us